Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकासाठी भारताला बोलावण्याचे पाकचे प्रयत्न सुरूच 

Champions Trophy 2025 : पुढील वर्षी चॅम्पियन्स करंडक पाकिस्तानमध्ये होणार आहे 

72
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकासाठी भारताला बोलावण्याचे पाकचे प्रयत्न सुरूच 
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकासाठी भारताला बोलावण्याचे पाकचे प्रयत्न सुरूच 
  • ऋजुता लुकतुके 

चॅम्पियन्स करंडक स्पर्धा पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणार आहे. भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये जाण्याविषयीचा निर्णय अजूनही घेतलेला नाही. आणि स्पर्धेसाठी हायब्रीड मॉडेल सुचवलं आहे. म्हणजेच भारताचे सामने पाकिस्तान बाहेर खेळवण्याची मागणी त्यांनी केली आहे. पण, पाकिस्तानने मात्र भारतीय संघाला पाकिस्तानमध्ये बोलवण्याचा चंग बांधला आहे. सुरक्षेची हमी देण्याबरोबरच त्यांनी संघाला इतर प्रलोभनं द्यायला सुरुवात केली आहे. पीसीबीकडून बीसीसीआयनं पाकिस्तानमध्ये खेळण्यासंदर्भात निर्णय घ्यावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी पीसीबीनं ऑफर जाहीर केली आहे.  (Champions Trophy 2025)

पीसीबीचे चेअरमन मोहसीन नक्वी यांनी म्हटलं की, भारतीय चाहत्यांसाठी चॅम्पियन्स करंडकासाठी विशेष कोटा ठेवला जाईल. याशिवाय भारतीय चाहत्यांच्या व्हिसाची प्रक्रिया देखील वेगवान केली जाईल. काही मिडिया रिपोर्टस नुसार मोहसीन नक्वी यांनी म्हटलं की, आम्ही भारतीय चाहत्यांसाठी तिकिटांचा विशेष कोटा निश्चित करणार आहोत. त्यांना व्हिसा जारी करण्यासाठी प्रक्रिया वेगवान करण्याचा प्रयत्न करणार आहोत.  (Champions Trophy 2025)

(हेही वाचा- अरविंद सावंत यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री Eknath Shinde संतापले; म्हणाले, थोबाड… )

आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धा फेब्रुवारी – मार्च २०२५ मध्ये पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे. मात्र, अजूनही आयसीसीकडून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळापत्रकाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. भारतात पाकिस्तानला जायचं असेल तर केंद्रसरकारची परवानगी लागते. त्यामुळे बीसीसीआयने आतापर्यंत केंद्रसरकारच्या निर्णयावर सगळं अवलंबून असल्याची भूमिका घेतली आहे.  (Champions Trophy 2025)

आशिया कप २०२३ चं आयोजन देखील पाकिस्तानकडे होते. त्यावेळ भारतीय क्रिकेट संघानं पाकिस्तानमध्ये सामने खेळले नव्हते. भारताचे सामने त्यावेळी श्रीलंकेत आयोजित करण्यात आले होते. आशिया कपची सेमी फायनल आणि फायनल श्रीलंकेत झाली होती.  (Champions Trophy 2025)

(हेही वाचा- Maharashtra Vidhan Sabha Election 2024: ठरलं तर! पंतप्रधान मोदींची महाराष्ट्रातील पहिली सभा ‘या’ दिवशी होणार)

दरम्यान, भारतानं पाकिस्तानमध्ये आयसीसी चॅम्पियन्स करंडक खेळण्यास नकार दिला आणि पाकिस्तान त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिल्यास मोठा पेच निर्माण होऊ शकतो. भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीतून माघार घेतल्यास श्रीलंकेला स्पर्धेत खेळण्याची संधी मिळू शकते. भारतात झालेल्या वनडे वर्ल्ड कपमध्ये पहिल्या आठ स्थानावर असलेल्या संघांना चॅम्पियन्स ट्रॉफीत प्रवेश मिळाला आहे. (Champions Trophy 2025)

हेही पहा-  

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.