Maharashtra Assembly Election 2024 : उध्दव ठाकरेंचे ठरले, माहीमची जागा लढणारच!

204
Sada Sarvankar यांनी निवडणूक लढवणे मनसेच्या पथ्यावर
Sada Sarvankar यांनी निवडणूक लढवणे मनसेच्या पथ्यावर
  • सचिन धानजी,मुंबई

माहीम विधानसभा मतदार संघात मनसेचे उमेदवार अमित राज ठाकरे (Amit Raj Thackeray) यांच्या विरोधात शिवसेना आणि उबाठा शिवसेनेचे उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून तर्कवितर्क लढवले जात असले तरी या मतदार संघाबाबत ठाकरेंचे ठरले गेले. शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर हे निवडणुकीतून माघार न घेण्या राज ठाकरे बाबत अडून बसलेले असतानाच उबाठा शिवसेनेनेही कोणत्याही परिस्थितीत माघार  न घेण्याचा निर्धार केला.  राज ठाकरे (Raj Thackeray) असो वा कोणीही असो या मतदार संघात निवडणूक लढवणारच असा पक्का निर्धार करत उमेदवार महेश सावंत (Mahesh Sawant) यांचे निवडणूक कार्यालय खुले केले जात आहे. शनिवारी सायंकाळी या मुख्य निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते पार पडणार आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

माहीम विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे सदा सरवणकर, उबाठा  शिवसेनेचे महेश सावंत आणि मनसेचे अमित राज ठाकरे यांच्यात प्रमुख लढत असून यासर्वांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर येत्या सोमवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे ठाकरे घराण्यातील या युवराजांना निवडून आणण्यासाठी शिवसेना आणि उबाठा शिवसेनेकडून आपल्या उमेदवारांचे अर्ज मागे घेण्याबाबत दबाव वाढत चालला आहे. भाजपाने आपला पाठिंबा अमित ठाकरे यांना दिला असून खुद्द मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेत्यांनीही सदा सरवणकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशाचप्रकारची भूमिका घेत मनसेला पाठिंबा देण्याचा विचार बोलून दाखवला. (Maharashtra Assembly Election 2024)

(हेही वाचा- Maharashtra Vidhan Sabha Election 2024: ठरलं तर! पंतप्रधान मोदींची महाराष्ट्रातील पहिली सभा ‘या’ दिवशी होणार)

मात्र, मनसे विरोधात लढण्याबाबत दोन्ही शिवसेनेचे उमेदवार हे अर्ज मागे न घेण्याच्या निर्णयावर ठाम असले तरी पक्षाचा आदेश आल्यास त्यांना अर्ज मागे घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे असतानाच उबाठा शिवसेनेचे उमेदवार महेश सावंत याचे निवडणूक प्रचार कार्यालय खुले केले जात आहे. माहीम एल जे रोडवरील काद्री वाडी येथे सावंत यांचे मुख्य निवडणूक प्रचार कार्यालय उघडले जाणार असून याचे कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी सात वाजता होणार आहे. त्यामुळे या निवडणूक प्रचार कार्यालयाच्या माध्यमातून महेश सावंत यांचा निवडणुकीतील माघार आता शक्य नसून उबाठा शिवसेनेचे उमेदवार म्हणून महेश सावंत हे अमित राज ठाकरे यांच्यासमोर आव्हान निर्माण करणार हे आता स्पष्ट झाले आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे मनसेच्यावतीने दीपोत्सव साजरा केला जात असून यंदाचे १२ वे वर्ष आहे. या दीपोत्सवामध्ये लावलेल्या कंदिलावर मनसेचे निवडणूक चिन्ह असलेल्या इंजिनचे चित्र आहे. तसेच या दीपोत्सवाच्या कार्यक्रमात या मतदार संघातील उमेदवार असलेले अमित राज ठाकरे हेही उपस्थित असल्याने यावर उबाठा शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी आक्षेप घेत राज्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार करत याचा खर्च उमेदवाराच्या खर्चात लावला जावा,अशी मागणी केली. यावरून उध्दव ठाकरे यांना ट्रोल केले जात असून हिंदुंच्या सणाला विरोध करत असल्याचा आरोप उबाठा शिवसेनेवर केला जात आहे. उबाठा शिवसेनेच्यावतीने मनसेच्या दीपोत्सवावर आक्षेप घेतल्यामुळेच महेश सावंत यांचा अर्ज माघारीचा मार्ग बंद झाल्याचे स्पष्ट झाले आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

(हेही वाचा- Ind vs NZ, 3rd Test : शेवटच्या ५ मिनिटांत भारतीय संघाने कशी केली हाराकिरी; जयसवाल आणि कोहलीही बाद )

दरम्यान, वरळी विधानसभेतून मनसेने आपली जागा लढवून संदीप देशपांडे यांचे आव्हान आदित्य ठाकरे यांच्यासमोर निर्माण केल्याने उबाठा शिवसेनेने माहीम विधानसभा मतदार संघात राज ठाकरेंना कोंडीत पकडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच जर वरळी मनसे लढणार असेल तर माहीममधून माघार का अशी भूमिका घेत प्रथम शिवाजीपार्क मधील दीपोत्सवावर आक्षेप नोंदवत  माघारी अर्जाची चर्चेचा मार्गच बंद करून टाकला आहे. त्यामुळे सदा सरवणकर हे काय निर्णय घेतात हे जरी सोमवारी स्पष्ट होणारे असले तरी अमित राज ठाकरे आणि महेश सावंत यांच्यात लढत होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे.  (Maharashtra Assembly Election 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.