Laxmi Mittal : लक्ष्मी मित्तल यांनी कसं उभं केलं पोलाद साम्राज्य 

Laxmi Mittal : लक्ष्मी निवास मित्तल यांना जगभरात स्टील मॅग्नेट म्हटलं जातं. 

28
Laxmi Mittal : लक्ष्मी मित्तल यांनी कसं उभं केलं पोलाद साम्राज्य 
Laxmi Mittal : लक्ष्मी मित्तल यांनी कसं उभं केलं पोलाद साम्राज्य 
  • ऋजुता लुकतुके

जगभरातील अतीश्रीमंत म्हणजे अब्जाधीशांची यादी तयार करणाऱ्या फोर्ब्जच्या यादीत पहिल्या तीनांत आलेला पहिला भारतीय कोण? या प्रश्नाचं उत्तर अनेक जण गौतम अदानी किंवा मुकेश अंबानी असं देतील. ही दोन्ही उत्तरं चुकीची आहेत. आणि ही व्यक्ती आहे लक्ष्मीनिवास मित्तल. २००५ मध्ये हा लौकिक त्यांनी मिळवला होता. त्यांच्या नावाच्या अद्याक्षराने सुरू होणारा समुह एलएनएम समुह ते चालवतात. आणि जगभरात त्यांची ओळख आहे स्टील मॅग्नेट म्हणजेच पोलाद सम्राट. (Laxmi Mittal)

(हेही वाचा- Maharashtra Assembly Election 2024 : उध्दव ठाकरेंचे ठरले, माहीमची जागा लढणारच!)

सध्या इंग्लंडमध्ये वास्तव्याला असले तरी ते मूळचे भारतीय आहेत. आणि आजही भारतीय नागरिक आहेत. वडिलांनी छोटेखानी निपॉन डेन्रो इस्पात नावाने सुरू केलेली कंपनी लक्ष्मीनिवास या त्यांच्या मुलाने इतकी वाढवली आहे आणि जगात पसरवली आहे की, ते जगभरातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे पोलाद उत्पादक आहेत. (Laxmi Mittal)

एका मारवाडी कुटुंबात १९५० मध्ये त्यांचा जन्म झाला असला तरी वडील व्यवसायाच्या निमित्ताने कोलकाता इथं होते. आणि लक्ष्मीनिवास यांचं शिक्षणही तिथेच झालं. पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी वडिलांच्या उद्योगात लक्ष घालायला सुरुवात केली. १९७६ मध्ये भारत सरकारने देशांतर्गत पोलाद उत्पादनावर मर्यादा आणल्या होत्या. तिथून लक्ष्मी यांनी आपल्या उद्योगाचा विस्तार बाहेर देशात सुरू केला. सुरुवातीला इंडोनेशिया इथं त्यांनी पोलाद प्रकल्प सुरू केला. तिथून त्रिनिदाद अँड टोबॅगो, आयर्लंड, मेक्सिको आणि कझाकिस्तान इथे आधापासून असलेले प्रकल्प विकत घेण्याचा सपाटा त्यांनी लावला. (Laxmi Mittal)

(हेही वाचा- Aditya Birla Textile : आदित्य बिर्ला समुहातील वस्त्रोद्योग कंपनी कुठली?)

वर म्हटल्याप्रमाणे त्यांच्या समुहाचं नाव एलएनएम समुह असं आहे. पण, जागतिक स्तरावर त्यांना मोठी ओळख मिळाली ती २००६ मध्ये त्यांनी फ्रान्समधील आर्सेलर ही पोलाद कंपनी विकत घेतली तेव्हा. जगातील ही दुसऱ्या मोठ्या आकाराची पोलाद कंपनी होती. लक्ष्मीनिवास यांनी कंपनीचं नाव बदलून आर्सेनल-मित्तल केलं. २००६ मध्ये हा व्यवहार ३४.४ अब्ज अमेरिकन डॉलरचा आणि तेव्हाचा सगळ्यात मोठा व्यवहार होता. तेव्हापासून त्यांच्या कंपन्या या आर्सेलर-मित्तल म्हणूनच अनेक ठिकाणी ओळखल्या जातात. (Laxmi Mittal)

मित्तल कुटुंब सध्या लंडनमध्ये वास्तव्याला आहे. तिथे २००४ मध्ये त्यांनी केनसिंगटन पॅलेस गार्डन ही व्हिला १२८ दशलक्ष अमेरिकन डॉलरला विकत घेतला होता. तेव्हाचा तो सगळ्यात मोठा रहिवासी वसाहतीसाठीचा व्यवहार होता. याशिवाय लंडनमध्ये त्यांची आणखी दोन घरं आहेत. (Laxmi Mittal)

(हेही वाचा- Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकासाठी भारताला बोलावण्याचे पाकचे प्रयत्न सुरूच )

सध्या लक्ष्मीनिवास मित्तल यांची मालमत्ता १६.४ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी आहे. फोर्ब्स यादीत ते ११३ व्या क्रमांकावर आहेत. (Laxmi Mittal)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.