Tata Motors DVR Share Price : टाटा मोटर्सने टाटा मोटर्स डीव्हीआर शेअर विक्री का थांबवली?

24
Tata Motors DVR Share Price : टाटा मोटर्सने टाटा मोटर्स डीव्हीआर शेअर विक्री का थांबवली?
Tata Motors DVR Share Price : टाटा मोटर्सने टाटा मोटर्स डीव्हीआर शेअर विक्री का थांबवली?
  • ऋजुता लुकतुके

टाटा मोटर्स ही टाटा समुहातील १९४५ मध्ये स्थापन झालेली कंपनी आहे. सुरुवातीला कंपनीचं नाव टाटा लोकोमोटिव्ह असं होतं. आणि डिझेलवर चालणारी सार्वजनिक वापरासाठीची वाहनं ही कंपनी बनवायची. हळू हळू कंपनी विस्तारत गेली. आणि रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने स्थिरपणे कमर्शिअल कार बनवण्याकडे लक्ष केंद्रीत केलं. तिथून टाटा इंडिका, टाटा नॅनो आणि आताच्या टाटा टियागो, नेक्सॉन अशा ब्रँडपर्यंत कंपनीचा प्रवास झाला आहे.  (Tata Motors DVR Share Price)

(हेही वाचा- निवडणुक चिन्ह असलेले MNS चे ‘ते’ कंदील मुंबई महापालिकेने हटवले)

टाटा मोटर्स या नावानेच कंपनीचे शेअर राष्ट्रीय आणि मुंबई शेअर बाजारात नोंदणीकृत आहेत. २००८ साली कंपनीने टाटा मोटर्स डीव्हीआर नावाने आपले नवीन शेअर भागधारकांसाठी आणले होते. डीव्हीआर म्हणजे डिफरन्शिअल व्होटिंग राईट्स असलेले टाटा मोटर्स कंपनीतील गुंतवणूकदार. २००१ मध्ये भारत सरकारने नोंदणीकृत कंपन्यांना डीव्हीआर शेअर बाजारात आणण्याची परवानगी दिली. अशा गुंतवणूकदारांचे हक्क किरकोळ गुंतवणूकदारांपेक्षा वेगळे आणि वरचे असतात. (Tata Motors DVR Share Price)

केंद्रसरकारच्या या परवानगी नंतर २००८ मध्ये टाटा मोटर्स ही डीव्हीआर शेअरची नोंदणी करणारी देशातली पहिली कंपनी ठरली होती. त्यावेळी रतन टाटा यांचा महत्त्वाकांक्षी जॅग्वार-लँडरोव्हर खरेदीच्या वाटाघाटी सुरू होत्या. आणि त्या व्यवहारासाठी टाटा मोटर्स कंपनीला रोख पैसे लागणार होते. ते मिळवण्यासाठी टाटा मोटर्सने डीव्हीआर शेअर नोंदणीकृत करून ६.४१ कोटी नवीन शेअर बाजारात आणले. आणि ते ४,१४५ कोटींना विकले. (Tata Motors DVR Share Price)

(हेही वाचा- निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मतदारांच्या हाती cVIGIL App नावाचे शस्त्र)

तेव्हापासून टाटा मोटर्स डीव्हीआर हा शेअरही भारतीय शेअर बाजारात खरेदी-विक्रीसाठी उपलब्ध झाला. पण, सप्टेंबर २०२४ पासून टाटा मोटर्सनी डीव्हीआर शेअर टाटा मोटर्समध्ये विलीन केला आहे. त्यामुळे १ ऑगस्टपासून या शेअरची खरेदी विक्री होत नाही. डीव्हीआरचे १० शेअर असतील तर त्यांना टाटा मोटर्सचे ७ शेअर मिळाले आहेत. या प्रमाणात टाटा मोटर्सचे शेअर जुन्या गुंतवणूकदारांना मिळाले आहेत. (Tata Motors DVR Share Price)

टाटा डीव्हीआर कंपनीचा शेअर त्यामुळे आता शेअर बाजारात ट्रेड होत नाही. टाटा मोटर्स कंपनी आता आपल्या सार्वजनिक वाहतुकीसाठीच्या गाड्या आणि कमर्शिअल गाड्या यांच्यासाठी दोन स्वतंत्र कंपन्या स्थापन करण्याच्या तयारीत आहे. अशा परिस्थिती दोन कंपन्यांच्या स्थापनेनंतर आताच्या टाटा मोटर्स शेअरचं विभाजन होईल. अशावेळी डीव्हीआरचे वेगळे नोंदणीकृत शेअर अडचणीचे ठरू शकतात. त्यामुळे पुढील व्यवहार सुटसुटीत करण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. (Tata Motors DVR Share Price)

हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.