-
ऋजुता लुकतुके
जानेवारी २०२२ मध्ये हिंडेनबर्ग अहवालानंतर भारतीय उद्योजक आणि अदानी समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांना जोरदार धक्का बसला. आणि ते जगातील श्रीमंतांच्या यादीतून पहिल्या दहांतून बाहेर फेकले गेले. कंपनीचे शेअर तेव्हा १०० टक्क्यांहून जास्त खाली कोसळले होते. आता पुढील दोन वर्षांत अदानी समुह या धक्क्यातून सावरताना दिसत आहे. आणि २०२४ मध्ये त्यांची एकूण मालमत्ता ११६ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी आहे. अजूनही ते सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीत मुकेश अंबानींच्या खालोखाल दुसरे आहेत. (Gautam Adani Net Worth)
(हेही वाचा- निवडणुक चिन्ह असलेले MNS चे ‘ते’ कंदील मुंबई महापालिकेने हटवले)
तर ताज्या हुरून २०२४ यादीत ज्या भारतीय उद्योजकांच्या एकूण संपत्तीत आधीच्या तुलनेनं वाढ झाली आहे, अशा उद्योजकांच्या यादीत गौतम अदानी पहिले आहेत. कारण, गेल्या ५ वर्षांत अदानी यांच्या संपत्तीत १०.५ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तर याच कालावधीत मुकेश अंबानी यांची संपत्ती ३.५ लाख कोटी रुपयांनी वाढली आहे. हुरुन संस्थेनं हा ताजा वेल्थ गेन अहवाल अलीकडेच प्रसिद्ध केला आहे. (Gautam Adani Net Worth)
Despite challenges following US-based short seller Hindenburg Research’s report against his companies in January last year, billionaire Gautam Adani and his family top the 2024 Hurun India Rich List, after their wealth increased 95 per cent to Rs 11.61 trillion.
Hindenburg… pic.twitter.com/Ljn1VnHtjH
— Mr. Kinuthia Pius. (@Belive_Kinuthia) October 29, 2024
६२ वर्षीय अदानी फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीतही सध्या १७ व्या क्रमांकावर आहेत. १९८८ साली एका छोट्या कमोडिटी ट्रेडिंग करणाऱ्या कंपनीने त्यांनी व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली होती. अदानी एंटरप्रायजेस ही त्यांची पहिली कंपनी. पण, पायाभूत सुविधा उभारणी क्षेत्रात गौतम अदानींना रस होता. आणि बंदर व विमानतळ विकासाच्या माध्यमातूनच त्यांनी आताचं अदानी उद्योगसमुहाचं साम्राज्य उभं केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी गौतम अदानींचे निकटचे संबंध आहेत. आणि मोदी पंतप्रधान झाल्यावर २०१५ पासून त्यांची औद्योगिक भरभराटही झाली आहे. गौतम अदानींची बहुतेक उत्पन्न हे त्यांच्या समुहातील कंपन्यांच्या बाजारमूल्यातून येतं. अदानी समुहातील सात कंपन्यांची शेअर बाजारात नोंदणी झाली आहे. आणि या कंपन्यांचे शेअर मागच्या पाच वर्षांत तिपटीहून जास्त वाढले आहेत. त्यातूनच गौतम अदानींची मालमत्ता वाढली आहे. (Gautam Adani Net Worth)
(हेही वाचा- निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मतदारांच्या हाती cVIGIL App नावाचे शस्त्र)
सध्या अदानी समुहाचा महसूल हा ३२ अब्ज अमेरिकन डॉलरच्या घरात आहे. बंदर व विमानतळ विकास तसंच व्यवस्थापन, हरित ऊर्जा, ऊर्जा निर्मिती, सिमेंट अशा उद्योगांमध्ये अदानी समुह प्रामुख्याने काम करतो. (Gautam Adani Net Worth)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community