-
ऋजुता लुकतुके
मूहूर्ताचं ट्रेडिंग ही फक्त भारतातच पाळली जाणारी प्रथा आहे. पण, १९५८ पासून ही परंपरा सुरू झाल्यानंतर जगभरातील संस्था या ट्रेडिंगमध्ये सहभागी होतात. या दिवशी केलेली गुंतवणूक बरकत आणते असा समज असल्यामुळे गुंतवणूकदार छोटीसी का होईना गुंतवणूक या दिवशी करतात. त्यामुळेच मागच्या १७ मूहूर्तांच्या ट्रेडिंग सत्रात फक्त ४ सत्रांमध्ये निर्देशांक खाली आला आहे. बाकी सर्व सत्र ही सकारात्मक होती. भारतीय गुंतवणूकदार शक्यतो या दिवशी खरेदी करतात. (Who Can Benefit From Muhurat Trading)
(हेही वाचा- राज्यात ८ नोव्हेंबरनंतर PM Narendra Modi यांच्या सभांचा धडाका)
यंदाचं मूहूर्ताचं ट्रेडिंगही सकारात्मक वातावरणात पार पडलं आहे. आणि सेन्सेक्स तसंच निफ्टी या दोन्ही निर्देशांकात वाढ झाली आहे. निफ्टी निर्देशांकाने २४,३०० च्या वर पुन्हा एकदा झेप घेतली आहे. पण, हे सत्र हे एक तासाचं विशेष सत्र असतं. आणि त्यामागे भावना असतात. बाकी नफा आणि तोट्याची गणितं या सत्रामुळे फारशी ठरत नाहीत. शिवाय एकाच तासाचं सत्र असल्यामुळे अल्पावधीसाठी तसंच एका दिवसासाठी अल्यल्प कालावधीचं ट्रेडिंग करणाऱ्यांना याचा फटकाच जास्त बसू शकतो. (Who Can Benefit From Muhurat Trading)
त्याविषयी तज्ज सावधानतेचा इशारा देताना दिसतात. शेअर बाजार गुंतवणूक तज्ज योगेंद्र सोमण यांनी म्हटल्याप्रमाणे मूहूर्ताच्या ट्रेडिंगला भावनिक महत्त्व आहे. व्यवहार बाजूला ठेवून खरेदी-विक्री करू नये. ‘एका तासात मोठे उतार चढाव बघायला मिळू शकतात. त्यामुळे किरकोळ गुंतणूकदारांनी या दिवशी शुभकाळ म्हणूनच किरकोळ गुंतवणूक करावी पैसे कमावण्यासाठी या सत्राकडे अजिबात पाहू नये. सकारात्मक वातावरणात पार पडणाऱ्या या गुंतवणुकीत जोखीमही तितकीच असते,’ असं जोशी म्हणाले. (Who Can Benefit From Muhurat Trading)
(हेही वाचा- निवडणुक चिन्ह असलेले MNS चे ‘ते’ कंदील मुंबई महापालिकेने हटवले)
यंदाच्या मूहूर्ताच्या ट्रेडिंगच्या वेळी शेअर बाजारात सकारात्मक वातावरण होतं. मागचे पंधरा दिवस बाजार कोसळलेले होते. त्यामुळे मोठ्या कंपन्यांचे शेअर स्वस्तात मिळत होते. त्यामुळे भारतीय नाही तर परकीय गुंतवणूकदारांनीही या मूहूर्ताच्या ट्रेडिंग दरम्यान खरोदी करण्यावर भर दिला. ‘मागच्या २४ वर्षांत १७ सत्र ही लाभदायी ठरली आहेत. पण, इतर ७ सत्रांमध्ये परकीय गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर विक्री केल्यामुळे शेअर बाजार गडगडलेही आहेत. अशावेळी किरकोळ गुंतवणूकदारांना जोखीम न घेता सुरक्षित गुंतवणुकीवर भर द्यावा. मूहूर्ताच्या दिवशी अल्पशी गुंतवणूक करून नियमित गुंतवणुकीवर भर द्यावा, असं शेवटी जोशी म्हणाले. (Who Can Benefit From Muhurat Trading)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community