Drugs : सपा कार्यालयातील ड्रग्ज सेवनाचा व्हिडीओ जुना असल्याचा पोलिसांचा दावा

154
Drugs : सपा कार्यालयातील ड्रग्ज सेवनाचा व्हिडीओ जुना असल्याचा पोलिसांचा दावा
Drugs : सपा कार्यालयातील ड्रग्ज सेवनाचा व्हिडीओ जुना असल्याचा पोलिसांचा दावा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे उमेदवार नवाब मलिक यांनी समाजवादी पार्टीचे उमेदवार अबू आजमीच्या  मानखुर्द शिवाजी नगर येथील कार्यालयात तरुणांकडून अमली पदार्थ सेवन करतांनाचा व्हिडीओ ‘एक्स’ हॅंडलवर पोस्ट करण्यात आला होता, मात्र हा व्हिडीओ खूप जुना असल्याचा दावा पोलिसाकडून करण्यात येत आहे, हा व्हिडीओचा वापर प्रत्येक निवडणुकीत करण्यात येत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.परंतु नवाब मलिक यांच्या सारख्या दिग्गज नेत्यांनी व्हायरल केलेल्या या व्हिडीओमुळे मात्र पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. (Drugs)
मानखुर्द – शिवाजी नगर या ठिकाणी असलेल्या अबू आजमी यांच्या कार्यालयात अमली पदार्थाचे सेवन करताना तसेच अमली पदार्थावर चर्चा करतानाचा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे नेते नवाब मलिक यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया हँडल वर पोस्ट केला होता. नवाब मलिक यांनी पोस्ट केलेला व्हिडीओ आणि त्या सोबतचा संदेशमुळे मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा मतदार संघातील पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. या व्हिडीओ संदर्भात पोलीस अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता हा व्हिडीओ खूप जुना असून सध्या त्या ठिकाणी समाजवादी पार्टीचे कार्यालय नसल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे. प्रत्येक निवडणुकीत तसेच विरोधक हा व्हिडीओ नवीन म्हणून सोशल मीडियावर व्हायरल करतात असे एका पोलिस अधिकारी यांनी म्हटले आहे. परंतु नवाब मलिक सारखे दिग्गज नेत्याकडून या प्रकारचे व्हिडीओ वकरणे म्हणजे गंभीर बाब असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. (Drugs)
मुंबईच्या पूर्व उपनगरातील सर्वात मोठा स्लम पॉकेट समजला जाणारा शिवाजी नगर मानखुर्द मध्ये ड्रग्सचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. स्थानिक पोलीस, अमली पदार्थ प्रतिबंधक शाखा, गुन्हे शाखा, अमली पदार्थ नियंत्रण विभाग ( एनसीबी) यांच्याकडून या परिसरात वारंवार कारवाई कारवाई होऊन देखील येथील अमली पदार्थ विक्री आणि सेवन करणाऱ्यावर नियंत्रण मिळवता आलेले नाही. शिवाजी नगर, बैगण वाडी इत्यादी ठिकाणी अनेक महिला आणि पुरुष लपून छपून अमली पदार्थाची विक्री करतात, त्यात गांजा, बटन, कोडीन सिरप,चरस,अफू आणि एमडी या अमली पदार्थाचा समावेश आहे.अमली पदार्थामुळे या विभागात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे, चोऱ्या, जबरी चोऱ्या, हल्ले, लूटमार या सारखे गुन्हे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घडताना दिसून येतात.ऑगस्ट महिन्यात एका १७ वर्षीय तरुणाची अमली पदार्थ विक्रीच्या वादातून डड्रग्स पेडलर्स कडून भररस्त्यात हत्या करण्यात आली होती. या परिसरात बुट्टू नावाचा व्यक्ती मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाचा व्यवसायात गुंतला आहे, त्याने संपूर्ण शिवाजी नगरात अमली पदार्थचा फैलाव केला आहे, त्याने परिसरात अनेक गुंड पाळून ठेवले असून त्याच्या विरुद्ध आवाज उठवणाऱ्यावर त्याचे गुंड शस्त्राने हल्ले करतात, त्यापेक्षा भयानक म्हणजे ज्या व्यक्तीने त्याच्याविरुद्ध तक्रार केली अथवा आवाज उचल्यावर तो अल्पवयीन मुलांचा वापर करून समोरच्या व्यक्तीला पोक्सो सारख्या खोट्या गुन्ह्यात अडकवतो. (Drugs)
बुट्टू यांच्यावर पोलिसांकडून अनेक वेळा कारवाई  करण्यात आलेली मात्र पुन्हा तो आपला बेकायदेशीर ड्रग्सचा धंदयाचे ठिकाण  बदलतो.गोवंडीतील शिवाजी नगर भागातील सर्वात मोठा ड्रग्ज तस्कर सिकंदर लंगडा याच्या घरावर पोलिसांनी एप्रिल २०२३ मध्ये छापा टाकला होता,  कारवाईदरम्यान पोलिसांनी येथून एक हजार पेक्षा अधिक  कोडीन मिश्रित कफ सिरप औषधे जप्त केली.  ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत दहा लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. पोलिसांनी मुख्य फरार आरोपी सिकंदरचा भाऊ आणि त्याच्या दोन अल्पवयीन मुला-मुलींना अटक करण्यात आली होती, तर सिकंदर आणि त्याची दोन मुले फरार झाले होते. बुट्टू सिकंदर लगडा या सारखे अनेक जण शिवाजी नगर मानखुर्द परिसरात अमली पदार्थाचा बेकायदेशीर धंदा करून अल्पवयीन मुले आणि तरुणपिढीचे आयुष्य नष्ट करीत आहे. (Drugs)
हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.