वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सर्वेसर्वा अॅड प्रकाश आंबेडकर (Adv. Prakash Ambedkar) यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी आयसीयूमधून जनतेला आणि कार्यकर्त्यांना संदेश दिला आहे. ते म्हणाले, मी सध्या आयसीयूमध्ये आहे. अँजीओग्राफी आणि अँजीओप्लास्टी दोन्ही झालेले आहे. मला डॉक्टरांनी निरीक्षणाखाली ठेवले आहे. निवडणुकीला सुद्धा सुरुवात झाली आहे. ही निवडणूक सर्वंसाठीच अत्यंत महत्वाची आहे. तसेच ओबीसींसाठी सुद्धा निवडणुक महत्वाची आहे. कारण विधानसभेनंतर ओबीसी आरक्षण थांबवले जाणार आहे. आपले आमदार निवडून आले, तर आरक्षणावरील हल्ला आपल्याला थांबवता येणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना आपले बहुमूल्य मत देऊन विजयी करा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Adv. Prakash Ambedkar) यांनी केले आहे.
( हेही वाचा : BJP मधील १७ नेते मित्रपक्षांतून निवडणुकीच्या रिंगणात)
दरम्यान ॲड. प्रकाश आंबेडकर (Adv. Prakash Ambedkar) यांनी म्हटले आहे की, दुसऱ्या बाजूस एससी, एसटी, ओबीसी आरक्षण वाचविण्याची ही अस्तित्वाची लढाई आहे. एससी, एसटी आरक्षणाच्या क्रिमीलेयरची अंमलबजावणी होणार आहे. या निवडणुकीत आपली सगळ्यांची जबाबदारी महत्वाची आहे. विधानसभेत आमदार निवडून आले, तर आरक्षणावरील हल्ला थांबवता येतो. आपण वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडरमागे उभे रहा, असे आवाहनही आंबेडकरांनी कार्यकर्त्यांना, उमेदवारांना आणि आरक्षणवादी जनतेला केले आहे. (Adv. Prakash Ambedkar)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community