बांगलादेशात (Bangladesh) हिंदू अल्पसंख्याक असून यांच्यावरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. बांगलादेशातील हिंदूंना टार्गेट करून त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. त्यामुळे हिंदू समाजात भीतीचे वातावरण पसरले आहे.
(हेही वाचा : Drugs : सपा कार्यालयातील ड्रग्ज सेवनाचा व्हिडीओ जुना असल्याचा पोलिसांचा दावा )
दरम्यान हिंदूंवरील अत्याचार रोखण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी दि. २५ ऑक्टोबर रोजी बांगलादेशात (Bangladesh) एक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चानंतर बांगलादेशातील (Bangladesh) हंगामी सरकारमधील गृहखात्याने हिंदूंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. बांगलादेशातील (Bangladesh) माजी पंतप्रधान शेख हसीना पदावरून पायउतार झाल्यानंतर धर्मांधांकडून मोठ्या प्रमाणात हिंदूवर अत्याचार सुरु आहेत.
तसेच बांगलादेशात (Bangladesh) नवरात्रोत्सवावेळी हिंदूंच्या मंदिरांची विटंबना करण्यात आली होती. दुर्गामातेच्या मूर्तीचीही तोडफोड करण्यात आली होती. त्याचबरोबर हिंदूंच्या घरांवर हल्ले करून त्यांना सरकारी नोकरीचा राजीनामा देण्यासही भाग पाडले जात आहे. या निषेधार्थ हिंदूंनी मोर्चा काढला होता. या मोर्चानंतर हिंदूंवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्याचवेळी दुसरीकडे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली. दरम्यान, मोहम्मद युनूस यांच्या हंगामी सरकारकडून अल्पसंख्याकांवर दडपशाही सुरू असल्याने हिंदूंकडून सुरक्षेची मागणी करण्यात येत आहेत. (Bangladesh)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community