मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघ प्रत्येक निवडणुकीत चर्चेचा विषय ठरत असतात. त्यातच महायुती आणि महाविकास आघाडीने मुंबईतील ३६ विधानसभेसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यात महाविकास आघाडीत काँग्रेसला (Congress) मुंबईतील ३६ जागांपैकी ११ जागा मिळाल्या. मात्र या ११ जागांपैकी फक्त २ जागांवर काँग्रेसने (Congress) मराठी उमेदवार दिलेत. तर ४ जागांवर मुस्लिम उमेदवारांना काँग्रेसने (Congress) निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. (Congress)
( हेही वाचा : Bangladesh मध्ये हिंदूवर देशद्रोहाचे गुन्हे; हंगामी सरकारकडून दडपशाहीचा डाव)
काँग्रेसला (Congress) मुंबईतील कुलाबा (हिरा देवासी), मुंबादेवी (अमिन पटेल), धारावी (ज्योती गायकवाड), चांदिवली (नसीम खान), मालाड (अस्लम शेख), वांद्रे पूर्व (असिफ जकारिया), अंधेरी पश्चिम (अशोक जाधव), कांदिवली (काळू बुधेलिया), चारकोप (यशवंत सिंग), शीव-कोळीवाडा (गणेश यादव), मुलुंड (राकेश शेट्टी) या मतदारसंघात उमेदवार दिले आहेत. त्यातील फक्त अंधेरी पश्चिममधून अशोक जाधव आणि धारावीतून ज्योती गायकवाड या मराठी उमेदवारांना काँग्रेसने संधी दिली आहे. याउलट काँग्रेसने (Congress) चांदिवलीत नसीम खान, मुंबादेवीत अमिन पटेल, मालाडमध्ये अस्लम शेख, वांद्रे असिफ जकारिया या मुस्लिम उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. (Congress)
उबाठा गटावर राजकीय वर्तुळातून टीका
यासगळ्यात शिवसेना उबाठा गटाची भुमिकेबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. कारण मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि भूमीपुत्रांसाठी १९६६ ला शिवसेनेची स्थापना झाली होती. मात्र २०१९ ला उबाठा गटाने काँग्रेससोबत जाऊन मराठीच्या आणि हिंदुत्वाच्या मुद्याला बगल दिली. त्यात आज मराठी माणसाचे हद्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील ११ मतदारसंघ उबाठा गटाला जागा वाटपाच्या तहात गमवावे लागले. तसेच काँग्रेसने ११ पैकी २ जागांवर मराठी उमेदवार देऊन उबाठाच्या अस्तित्त्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. त्याचबरोबर उबाठा गटावर मराठी माणसाच्या हक्काचा मुद्दा कुठे गेला? असा प्रश्न राजकीय वर्तुळातून विचारला जात आहे. (Congress)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community