MP Arvind Sawant यांनी मागितली ‘त्या’ विधानावरून शायना एनसी यांची माफी

251
MP Arvind Sawant यांनी मागितली 'त्या' विधानावरून शायना एनसी यांची माफी
MP Arvind Sawant यांनी मागितली 'त्या' विधानावरून शायना एनसी यांची माफी

शिवसेनेच्या मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार शायना एनसी (Shaina NC) यांच्याबद्दल खासदार अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांनी वादग्रस्त विधान केले. त्यानंतर राज्यभर त्यांच्यावर टीका झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अरविंद सावंतांच्या वक्तव्याचा निषेध करत सुसंस्कृतपणा जपाण्याचा सल्ला दिला. त्यात शायना एनसी यांनी सावंतांवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर आपली भुमिका बदलत अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांनी शायना एनसी (Shaina NC) यांची दिलगरी अर्थात एकप्रकारे माफी मागितली आहे.

(हेही वाचा : Sunil Kedar यांच्या बंडखोर समर्थकांमुळे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार धोक्यात

खासदार अरविंद सावंत (MP Arvind Sawant) म्हणाले की, मी हिंदुहद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत शिवसैनिक आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे मावळे आहोत. त्यामुळे आम्ही स्त्रियांचा अवमान कधीही करणार नाही. किंबहुना राजकीय कारकीर्दीत मी कधीही कोणत्याही महिलेचा अवमान केला नाही, करणार नाही, करत नाही, असे सावंत म्हणाले. तरीही माझ्या त्या वक्तव्यामुळे कुणाच्याही भावना दुखावल्या असतील तर मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो, असे सावंत म्हणाले.

आमच्याकडे इंपोटेंट माल चालत नाही, ओरिजनल मालच इथे चालतो. तसेच मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात बाहेरचा माल चालणार नाही. मुंबादेवीत फक्त आपलाच माल चालेल आणि तो म्हणजे अमीन पटेल, असे विधान अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांनी केले होते. ज्यानंतर राजकीय वर्तुळातून झालेल्या टीकेमुळे त्यांना जाहीरपणे दिलगिरी वक्तव्य करावे लागली आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.