ऑक्टोबर २०२४ मध्ये GST कलेक्शन किती झाले; जाणून घ्या आकडा…

165
सरकारने यंदाच्या ऑक्टोबर २०२४ मध्ये सरकारने GST अर्थात वस्तू आणि सेवा करा १ लाख ८७ हजार कोटी गोळा केला. मागील वर्षीच्या तुलनेत ही रक्कम ९ टक्क्यांनी अधिक आहे. यावरून GST कलेक्शनमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे.
ऑक्टोबर २०२३मध्ये १ लाख ७२ हजार कोटी GST कलेक्शन झाले होते. GST संकलन हे आजवर दुसरे सर्वात मोठे संकलन आहे. याआधी एप्रिल २०२४ मध्ये २ लाख १० हजार कोटी आणि एप्रिल २०२३मध्ये १ लाख ८७ हजार कोटी रुपये इतके GST संकलन झाले होते. सप्टेंबर २०२४मध्ये १ लाख ७३ हजार कोटी जमले होते. कलेक्शनमध्ये सिंगल डिजिट वाढीचा हा तिसरा महिना आहे. सप्टेंबरमध्ये सकल जीएसटी संकलन ६.५% वाढले. ऑक्टोबर हा सलग आठवा महिना आहे जेव्हा मासिक संकलन १.७ लाख कोटींहून अधिक झाले आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या पहिल्या सहामाहीत GST संकलन १०.८७ लाख कोटी रुपये होते, जे FY 24 च्या पहिल्या सहामाहीपेक्षा ९.५% जास्त होते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.