दिंडोशीत BJP कुणाला मतदान करणार?

414
दिंडोशीत BJP कुणाला मतदान करणार?
दिंडोशीत BJP कुणाला मतदान करणार?
  • विशेष प्रतिनिधी,मुंबई

दिंडोशी विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्यावतीने माजी खासदार संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांना उमेदवारी देण्यावरून भाजपामध्ये (BJP) नाराजीचा सूर उमटू लागला आहे. त्यामुळे विद्यमान आमदार सुनील प्रभु (Sunil Prabhu) यांच्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचे दिसून येत असले तरी बऱ्याच ठिकाणी भाजपाने मनसेला पाठिंबा असल्याचे उघडपणे जाहीर केले, त्याचे परिणाम दिंडोशीतही दिसून येईल असे बोलले जात आहे. त्यामुळे दिंडोशी मतदार संघात भाजपा हे शिवसेनेच्या निरुपम यांना मतदान करणार की मनसेला करणार असा प्रश्न उपस्थित होतो.

दिंडोशी विधानसभा मतदार संघातून उबाठा शिवसेनेच्यावतीने विद्यमान आमदार सुनील प्रभु, (Sunil Prabhu) तर शिवसेनेच्यावतीने माजी खासदार संजय निरुपम, (Sanjay Nirupam) मनसेचे भास्कर परब आणि वंचितच्यावतीने राजेंद्र ससाणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. शिवसेनेच्यावतीने संजय निरुपम यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपाचे मोहित कंबोज, माजी आमदार राजहंस सिंह तसेच येथील भाजपाचे माजी नगरसेवक विनोद मिश्रा यांनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली तसेच निरुपम यांच्यासाठी स्थानिक भाजपाच्या नेत्यांनी काम न करण्याचा निर्धारही केला आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार संजय निरुपम यांच्यासमोर मोठा अडचणींचा डोंगर उभा आहे. हा विरोध लक्षात घेता महाविकास आघाडीचे सुनील प्रभु (Sunil Prabhu) हे निश्चिंतच आहे.

(हेही वाचा – Mallikarjun Kharge यांच्या ‘त्या’ पोस्टवर पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल)

मात्र, भाजपाने (BJP) काही मतदार संघांमध्ये मनसेला पाठिंबा जाहीर केल्याने या मतदार संघात भाजपाच्या मतदारांसमोर मनसेचा पर्याय खुला आहे. त्यामुळे भाजपाचे (BJP) मतदान निरुपम विरोधात जावून ते प्रभु ऐवजी मनसे उमेदवाराच्या पारड्यात पडेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

या मतदार संघात मनसेचे सरासरी १८ ते २० हजार मतदार असून भाजपा (BJP) सुमारे ३० हजार मतदारांची साथ मिळाल्यास मनसे उमेदवाराला सुमारे ५० हजारांपर्यंत मतदानाचा आकडा पार करता येईल. मात्र, दुसरीकडे उबाठाची सुमारे ३० हजार मते आणि काँग्रेसची सुमारे ३० ते ३५ हजार मते पाहता प्रभु यांच्यासाठी हा मतदार संघ अनुकूल असून ते विजयाची हॅट्रीक मारण्यासाठी सज्ज आहे. या भागात बहुतांशी कोकणातील आणि उत्तर भारतीय मतदार संघ असल्याने त्यांना धनुष्यबाणच माहित असल्याने निरुपम यांना काहीप्रमाणात मतदान होऊ शकते. जर भाजपाने (BJP) मन लावून काम केल्यास निरुपम आणि प्रभु यांच्या लढत होईल, अन्यथा मनसेचे भास्कर परब आणि आणि सुनील प्रभु (Sunil Prabhu) यांच्यात लढत होण्याची दाट चिन्हे दिसून येत आहेत.

या मतदार संघातील शिवसेनेकडे सध्या विनया विनय सावंत, आत्माराम चाचे हे दोन नगरसेवक असल्याने शिवसेनेची विभागातील ताकद वाढलेली आहे. विनय सावंत यांचा या मतदार संघाचा अभ्यास असल्याने निरुपम यांच्यासाठी ते महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे आजवर सुनील प्रभु यांना निवडून आणण्यात महत्वाची भूमिका बजावणारे विनय सावंत आता निरुपम यांना निवडून अणण्यात कसे यशस्वी होतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.