मनोज जरांगे पाटील आज एक बोलतील, संध्याकाळी एक बोलतील, उद्या एक बोलतील. मला वाटते 4 नोव्हेंबरनंतर मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) रुग्णालयात दाखल होतील, त्यांना सलाईन लावलेली असेल. जरांगे निवडणुकीत माणसे उभी करणार नाहीत, अशा शब्दांत ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर खोचक टोला हाणला.
दरम्यान लक्ष्मण हाके म्हणाले की, जरांगेंच्या (Manoj Jarange Patil) यादीला ओबीसींची यादी तयार असल्याचे हाके यांनी सांगितले. आनंदराज आंबेडकर, मुस्लिम धर्मगुरू जरांगेला भेटले. मात्र, ओबीसीच्या आंदोलनाबाबत जरांगेची जी भूमिका आहे ती आनंदराज आंबेडकरांना मान्य आहे का? मोमीन म्हणून धर्मगुरू जरांगेला भेटले. मी या आधी त्यांचे नाव कधी ऐकले नाही. विशाळ गडावरती मुस्लिमांचे धर्मस्थळ पाडले जात असताना त्याला संभाजी भोसलेंचा पाठींबा जरांगेना चालतो. तर ‘एमएम’डी कसे अस्तित्वात येऊ शकते?, असे हाके म्हणाले.
(हेही वाचा पोलिसांच्या वाहनातून उमेदवारांना रसद पुरवली जाते; शरद पवारांच्या आरोपावर Devendra Fadnavis काय म्हणाले?)
काय म्हणाले लक्ष्मण हाके?
मी मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी उमेदवार उभे करण्याची वाट बघतोय. कुठल्या लोकांना मतदार करायचे नाही त्याची यादी तयार आहे. काही ठिकाणी आमचे उमेदवार आहेत. जरांगे 4 नोव्हेंबरला उमेदवार देणार नाहीत, तर रुग्णालयात भरती असतील, अशी टीका करत मराठ्यांच्या यादीला आम्ही ओबीसींची यादी तयार केल्याचे लक्ष्मण हाके यांनी सांगितले. जरांगेंना राजकारणातील ज्ञान शून्य आहे, असे जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले.
Join Our WhatsApp Community