हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण दीपावलीचे (Deepawali) जगभरातील नेत्यांना आकर्षण असते. यंदाच्या वर्षी जगभरातील नेत्यांनी Deepawali च्या शुभेच्छा दिल्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी स्वतः व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली.
What a special way to celebrate Diwali by looking up to the stars and honoring the triumph of light over darkness.
Happy Diwali, America. pic.twitter.com/SQNOuoTRma
— President Biden (@POTUS) November 1, 2024
जगातील अनेक देशांच्या मोठ्या नेत्यांनी ३० ऑक्टोबर या दिवशी दिवाळी साजरी केली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान ‘व्हाईट हाऊस’मध्ये अध्यक्ष जो बायडेन यांनी दिवाळी (Deepawali) साजरी केली. ब्रिटनच्या पंतप्रधानांनी त्यांच्या निवासस्थानी दिवे लावले. तसेच ब्रिटनमध्ये दिवाळी साजरी करणार्या हिंदू धर्मियांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.
ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर महिना हिंदू हेरिटेज महिना म्हणून साजरा होणार
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी इंस्टाग्रामवर एक ‘पोस्ट’ टाकली आहे. त्यात त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘दिवाळी (Deepawali) दिव्यांचा सण असून तो आनंदाने साजरा केला पाहिजे’, असेही त्यांनी म्हटले. तसेच ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर महिना हिंदू हेरिटेज महिना म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. या महिन्यात नवरात्री, दिवाळी, छट्ट पूजा हे सर्व हिंदू सण या महिन्यात साजरे केले जातात, असे पंतप्रधान अँथनी अल्बानीज म्हणाले.
तर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तान आणि जगभरात रहाणार्या हिंदूंना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सुंयुक्त अरब अमिरातचे शासक शेख महंमद बिन झायेद यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत लिहिले, ‘संयुक्त अरब अमितरात आणि जगभरातील दिवाळी साजरी करणार्या सर्व लोकांना हार्दिक शुभेच्छा. दिव्यांचा हा पवित्र सण सर्वांच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो आणि देव तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला सदैव सुरक्षित ठेवो.’
Join Our WhatsApp Community