देशातील देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बॉम्बच्या धमक्या (Bomb Threat) देण्याचं सत्र अजुनही सुरूच आहे. या धमक्या देणाऱ्याला पोलिसांनी गडाआड केले आहे. हा धमकी देणारा मुळचा गोंदियाचा रहिवासी आहे. दरम्यान त्याची चौकशी केली असता, तो हे का करायचा याचं उत्तर ऐकून पोलिसही चक्रावून गेले आहेत. (Bomb Threat)
(हेही वाचा-National Youth Award साठी अर्ज पाठवण्याचे आवाहन; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज)
विमान कंपन्या आणि रेल्वेत स्फोट घडेल अशी माहिती देणारे ईमेल पाठवणाऱ्या जगदीश उईकेने (Jagdish Uike) एक-दोन नव्हे, तर तब्बल 36 ईमेल पाठवल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी जगदीश उईकेला अटक केली असून त्याने ईमेल करण्यासाठी वापरलेले कॉम्प्युटर आणि इतर डिवाइस ही पोलिसांनी जप्त केले आहेत. (Bomb Threat)
(हेही वाचा-दहिसर विधानसभेत यंदा चौधरींच्या समोर Vinod Ghosalkar यांचे कडवे आव्हान)
सध्या नागपूर पोलिसांचे सायबर सेल त्या सर्व डिवाइसचा ॲनालिसिस करत असून त्याच्यातून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता असल्याची माहिती नागपूरची पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी दिली. दरम्यान जगदीश उईके तपासात सहकार्य करत नसून वारंवार वेगवेगळी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. (Bomb Threat)
जगदीश उईकेने काही वर्षांपूर्वी “आतंकवाद एक तुफानी राक्षस” नावाचा पुस्तक लिहिलं होतं. ते पुस्तक प्रकाशित व्हावं, यासाठी त्याने हे ईमेल केल्याचे तो तपासात सांगत आहे. मात्र, पोलिसांचा त्याच्या या थेअरीवर विश्वास नसून नागपूर पोलिसांसह इतर एजन्सीस जगदीश उईकेचा सखोल तपास करत असल्याचे पोलीस आयुक्त म्हणाले. (Bomb Threat)
कोण आहे जगदीश उईके?
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील तो रहिवासी आहे. जगदीशला 2021 मध्ये याच कारणावरून अटक करण्यात आली होती. यावेळी नागपूर पोलिसांनी जगदीश याला संपर्क केला असता त्याने पोलिसांसमोर हजर होण्याचे आश्वासन दिले होते. तसा एकटा राहणारा 42 वर्षीय जगदीश उर्फ जग्गू मानसिक रुग्ण असल्याचे कळते. लहान पणी वडिलांचा मृत्यू झाल्यापासून तो असाच राहतो. काही दिवसांपूर्वी विमान कंपन्यांना त्याने नागपूर आणि दिल्ली येथून धमकीचे ई मेल पाठवले होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. (Bomb Threat)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community