Maharashtra Assembly Election 2024: मुख्यमंत्री म्हणून कोणाला पसंती? सी-व्होटरचा सर्व्हे काय सांगतो?

209
Maharashtra Assembly Election 2024: मुख्यमंत्री म्हणून कोणाला पसंती? सी-व्होटरचा सर्व्हे काय सांगतो?
Maharashtra Assembly Election 2024: मुख्यमंत्री म्हणून कोणाला पसंती? सी-व्होटरचा सर्व्हे काय सांगतो?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) एकीकडे प्रचाराची सुरूवात होत असताना दुसरीकडे सी-व्होटरचा सर्व्हे समोर आला आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची लोकप्रियता वाढली असल्याचे समोर आले आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांची लोकप्रिया वाढली असताना जनता सरकारच्या कामावर नाराज असल्याचे दिसत आहे. परंतु लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरणार असल्याचे म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता कमी
महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री म्हणून विद्यामान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात लढत सर्व्हेतून दिसत आहे. 27.5 लोकांनी एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यास संमती दिली आहे. 23 लोकांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री हवे आहेत. 11 टक्के लोकांना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री व्हावे असे वाटते. शरद पवार (Sharad Pawar) यांना 6 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांना 3 लोकांनी पसंती दिली आहे. सर्व्हेतून देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता कमी झाल्याचे दिसत आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

सी-व्होटरच्या सर्व्हेमध्ये नेमकं काय?
सी-व्होटरच्या सर्व्हेमध्ये 51% लोक शिंदे सरकारच्या कामावर नाराज आहे. त्यांना बदल हवा आहे. परंतु 41% जनता सरकारवर समाधानी आहे. शिंदे सरकारसाठी जास्त टक्के लोक नाराज असणे हा अडचणीचा मुद्दा ठरु शकतो. परंतु यानंतर शिंदे सरकारला दिलासा देणारी बाब आहे. ती म्हणजे 52 लोक महायुती सरकारने विकासाची कामे चांगली केल्याचे म्हटले आहे. 21 टक्के लोकांनी सरकारचे काम सरासरी असल्याचे म्हटले आहे. 23 टक्के लोकांनी सरकारचे काम खराब असल्याचे म्हटले आहे. 51 टक्के लोकांनी विद्यामान आमदारांना पुन्हा संधी देण्याचे म्हटले आहे. परंतु 30 टक्के लोकांना बदल हवा आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

मराठा आरक्षण मुद्याचा परिणाम होणार ?
मुख्यमंत्री शिंदे यांची ‘लाडकी बहीण योजना’ चा मोठा परिणाम लोकांवर दिसत आहे. या योजनेबाबत 45 टक्के लोकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. यामुळे निवडणुकीत ही योजना ‘गेम चेंजर’ ठरु शकतो. मराठा आरक्षण मुद्याचा परिणाम निवडणुकीवर होणार आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.