Maharashtra Assembly Election 2024 : भाजपा अमित ठाकरेंचाच प्रचार करणार; प्रसाद लाड यांनी स्पष्टच सांगितलं

109
Maharashtra Assembly Election 2024 : भाजपा अमित ठाकरेंचाच प्रचार करणार; प्रसाद लाड यांनी स्पष्टच सांगितलं
Maharashtra Assembly Election 2024 : भाजपा अमित ठाकरेंचाच प्रचार करणार; प्रसाद लाड यांनी स्पष्टच सांगितलं

विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर सध्या मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. माहीम विधानसभेत तिरंगी लढत होणार आहे. अमित ठाकरे (Amit Thackeray) निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने महायुतीकडून सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न सुरू होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्यास ४ नोव्हे. शेवटचा दिवस असेल.

(हेही वाचा-BJP manifesto: “महिलांना दरमहा २१०० रुपये, सरकारी नोकरी…”, झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध)

दरम्यान, मनसे नेते व माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी आज (३ नोव्हे.) भाजपा आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांची भेट घेतली. या भेटीनंतर लाड यांनी माहीम विधानसभेबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. आमदार लाड म्हणाले, “अमित ठाकरे हा आमच्या कुटुंबातील मुलगा पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे. अमित ठाकरे राज ठाकरेंचा मुलगा असला तरी आम्ही त्याला आमच्या मुलासारखाच समजतो आणि या निवडणुकीत आम्ही राज ठाकरे यांना मदत करावी यावर ठाम आहोत.” (Maharashtra Assembly Election 2024)

(हेही वाचा-Sada Sarvankar: “…तर मी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तयार”, सदा सरवणकरांची अट काय?)

“सदा सरवणकर हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांची समजूत काढतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. विधानसभेवरील आमदार असो, अथवा विधान परिषदेवरील आमदार असो, शेवटी आमदार हा आमदारच असतो. सदा सरवणकर हे कित्येक वेळा जनतेतून निवडून विधानसभेवर गेले आहेत. यावेळी त्यांना विधान परिषदेवर पाठवून त्यांची समजूत काढता येईल. एकनाथ शिंदे यांनी त्यांची समजूत काढून त्यांना विधान परिषदेवर संधी द्यायला हवी. यासह त्यांच्याकडे श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचं अध्यक्षपद पाच वर्षांसाठी देण्यात आलं आहे. तसेच त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे मला वाटतंय की, सरवणकर या सगळ्या गोष्टींचा विचार करून आमची भूमिका मान्य करतील. भाजपाची भूमिका स्पष्ट आहे, आम्ही या निवडणुकीत अमित ठाकरे यांचा प्रचार करणार आहोत.” असं प्रसाद लाड म्हणाले. (Maharashtra Assembly Election 2024)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.