उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांना शनिवारी सायंकाळी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. दहा दिवसांत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्या अन्यथा माजी आमदार बाबा सिद्दिकी यांच्याप्रमाणे तुमचा शेवट करू, अशा धमकीचा संदेश मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला होता.
(हेही वाचा-Maharashtra Assembly Election 2024 : भाजपा अमित ठाकरेंचाच प्रचार करणार; प्रसाद लाड यांनी स्पष्टच सांगितलं)
आता धमकी देणार्या संशयित तरुणीला ताब्यात घेतले आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथून २४ वर्षीय फातिमा खान (Fatima Khan) नावाच्या तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर तरुणी माहिती तंत्रज्ञान शाखेतून पदवीधर झालेली आहे. तिची मानसिक स्थिती बरी नसल्याचे सांगण्यात येत आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या बातमीनुसार, फातिमा खान ही उच्चशिक्षित तरुणी आहे. मात्र तिची मानसिक स्थिती ठीक नाही. मुंबईच्य दहशतवादी विरोधी पथक आणि उल्हासनगर पोलिसांनी एकत्रितपणे केलेल्या कारवाईत संशयित तरुणीला ताब्यात घेण्यात आले. (CM Yogi Adityanath)
मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला शनिवारी सायंकाळी धमकीचा संदेश प्राप्त झाला होता. एका अनोळखी क्रमांकावरून धमकीचा संदेश पाठविण्यात आला होता. दहा दिवसांत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा न दिल्यास बाबा सिद्दिकी यांच्याप्रमाणेच परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी धमकीत म्हटले होते. (CM Yogi Adityanath)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community