Jarange Patil यांचे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र टार्गेट; मविआला छुपा पाठिंबा?

77
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याकरता काही तास उरले आहेत. त्यामुळे आता सर्व राजकीय पक्ष बंडखोरांना समजावण्यासाठी प्रयत्न करत आहे, मात्र त्यातच मनोज जरांगे पाटील (Jarange Patil) यांचे राजकारण जोर धरत आहे. मागील दोन आठवड्यापासून जरांगे पाटील यांनी ३ नोव्हेंबरला निवडणुकीत काय भूमिका घ्यायची, कुठे जिंकण्यासाठी लढायचे आणि कुठे पाडण्यासाठी लढायचे याची घोषणा करणार असल्याचे सांगत होते. त्यानुसार त्यांनी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही मतदार संघांची घोषणा केली, त्यावरून जरांगे पाटलांचा मविआला छुपा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे.
जरांगे पाटील (Jarange Patil) 7 मतदारसंघामध्ये उमेदवार उभे करणार असून 6 मतदारसंघांमध्ये उमेदवार पाडण्याची मोहीम राबवणार आहे. तर 2 मतदासंघांमध्ये पाठिंबा देणार असल्याचे सांगितले. जिथे आपली ताकद आहे तसेच ज्या भागात अन्य पक्षांचे, गटांचे समर्थन मिळणे शक्य आहे तेथे निवडणूक लढवण्यार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

‘या’ मतदासंघात निवडणूक लढवणार

  •  बीड जिल्ह्यातील केज आणि बीड शहर
  • जालना जिल्ह्यातील परतूर
  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री
  • हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली शहर
  • परभणी जिल्ह्यातील पाथरी
  • नांदेड जिल्ह्यातील हदगाव

(हेही वाचा Maharashtra Assembly Election 2024 : भाजपा अमित ठाकरेंचाच प्रचार करणार; प्रसाद लाड यांनी स्पष्टच सांगितलं)

‘या’ मतदारसंघांत पाडण्याची मोहीम राबवणार

  • जालना जिल्ह्यातील भोकरदन
  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर
  • हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी
  • परभणी जिल्ह्यातील गंगाखेड आणि जिंतूर
  • लातूर जिल्ह्यातील औसा

‘या’ मतदारसंघात देणार पाठिंबा

जालना जिल्ह्यातील बदनापूर राखीव मततदारसंघ आणि छत्रपती संभाजीनगर शहर पश्चिम या दोन मतदारसंघात पाठिंबा देण्याचे मनोज जरांगे यांनी ठरवले आहे.

संतोष बांगर, अभिमन्यू पवार, दानवेंचा मुलगा मनोज जरांगेंच्या हिटलिस्टवर

तूर्तास तरी जरांगे पाटील यांचे भाजपा आणि शिंदे गटाचे उमेदवार टार्गेटवर असल्याचे दिसत आहे. कळमनुरीमध्ये शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर, औसामधून भाजप आमदार अभिमन्यू पवार, भोकरदनमधून माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा मुलगा संतोष दानवे आदी दिग्गज चेहरे मनोज जरांगे पाटील यांच्या हिटलिस्टवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.