इराणमध्ये पुन्हा Hijab बंदी आंदोलन; मुस्लिम विद्यार्थिनीचा अर्धनग्न होऊन विद्यापीठ परिसरात संचार; व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ

ही विद्यार्थिनी अर्धनग्न होऊन विद्यापीठ संकुलात वावरत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. इराणी विद्यार्थ्यांशी संबंधित अमीर कबीर या वृत्तसंकेतस्थळाने हे व्हिडीओ पहिल्यांदा पोस्ट केला.

187
२०२२ साली इराणमध्ये Hijab सक्तीच्या विरोधात आंदोलन उसळले होते. यात म्हासा अमिनी या महिलेला अटक करण्यात आली होती. त्यावेळी तिचा मृत्यू झाला, त्यानंतर इराणमधील महिलांनी रस्त्यावर उतरून आक्रोश व्यक्त केला होता. आंदोलक महिलांनी एकत्र येत डोक्यावरचा स्कार्फ काढून त्याची सामूहिक होळी पेटवली होती. हे आंदोलन दडपण्यासाठी इराणी सरकारने बळाचा वापर केला, ज्यामध्ये ५५१ जणांचा मृत्यू झाला होता. तर हजारो लोकांना अटक झाली. आता इराणमध्ये पुन्हा Hijab सक्ती विरोधी आंदोलन पेटले आहे.
इराणमधील इस्लामिक आझाद विद्यापीठातही विद्यार्थिनींना हिजाब सक्ती केली जाते. या विरोधात एका मुस्लिम विद्यार्थिनींनी या हिजाब सक्तीच्या विरोधात अर्धनग्न होऊन विद्यापीठ परिसरात आंदोलन केले. याचा व्हिडिओ वायरल होताच जगभरात खळबळ उडाली आहे.
ही विद्यार्थिनी अर्धनग्न होऊन विद्यापीठ संकुलात वावरत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. इराणी विद्यार्थ्यांशी संबंधित अमीर कबीर या वृत्तसंकेतस्थळाने हे व्हिडीओ पहिल्यांदा पोस्ट केला. त्यानंतर पर्शियन भाषेतील प्रमुख माध्यमांनी या व्हिडीओची दखल घेतली. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विद्यापीठावर टीका होऊ लागली. यानंतर विद्यापीठाचे प्रवक्ते अमीर महजूब यांनी एक्सवर पोस्ट टाकत आपली बाजू मांडली. ते म्हणाले, “पोलिसांच्या चौकशीत ही विद्यार्थीनी मानसिक तणावाखाली असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ही विद्यार्थीनी कुठे आहे याची निश्चित माहिती मिळू शकलेली नाही.

अटक करताना झाली मारहाण

आंदोलनकारी विद्यार्थीनीला ताब्यात घेताना मारहाण करण्यात आल्याचा दावा अमीर कबीर वृत्तसंकेतस्थळाने केला आहे. यानंतर ऍम्नेस्टी इंटरनॅशनलने या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. इराणने या विद्यार्थीनीला ताबडतोब सोडले पाहीजे, अशी मागणी करण्यात आली आहे. तिला आपली बाजू मांडण्याचा अधिकार असून तात्काळ वकील नेमून द्यावा आणि कुटुंबाला भेटण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. Hijab

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.