Nawab Malik यांच्या जावयाचे निधन

267
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचा जावई समीर खान (Sameer Khan) यांचे रविवार, ३ नोव्हेंबर रोजी निधन झाले. समीर खान यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता आणि ते रुग्णालयात अनेक दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होते. रविवारी अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
अपघातानंतर कोहीनूर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. समीर खान यांच्या मृत्यूबाबत स्वतः नवाब मलिक (Nawab Malik) यांनी माहिती दिली आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले की, माझे जावई समीर खान यांचे निधन झाले आहे. अल्लाह त्यांना स्वर्गात सर्वोच्च स्थान देवो. समीर यांच्या जाण्याने आमच्या परिवाराचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील दोन दिवसांचे माझे सर्व नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत. नवाब मलिकांची (Nawab Malik) मोठी मुलगी निलोफर मलिक हिचे ते पती होते. 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास त्यांचा अपघात झाला होता. नवाब मलिक यांची मुलगी निलोफर व त्यांचे पती समीर खान क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये नियमित आरोग्य तपासणीसाठी गेले होते. तपासणी झाल्यानंतर घरी येण्यासाठी ते कारची वाट बघत उभे होते, त्यावेळी त्यांच्याच ड्रायव्हरने त्यांच्या अंगावर गाडी घातली होती.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.