UCC निश्चितपणे लागू होणार; Amit Shah यांची मोठी घोषणा

119
झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यावेळी गृहमंत्री अमित शाह यांनी झारखंडमध्ये समान नागरी (UCC) कायदा निश्चितपणे लागू केली जाईल, अशी घोषणा केली.
भाजपा झारखंडमधील कुशासन आणि भ्रष्टाचार संपवेल आणि माती, बेटी आणि रोटीचे रक्षण करेल. आदिवासींचे कोणतेही अधिकार हिरावून घेतले जाणार नाहीत. उत्तराखंडमधील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने एक आदर्श देशासमोर ठेवला आहे. त्यात आम्ही आदिवासींना त्यांच्या चालीरीती, संस्कार आणि दिले आहेत. त्यांचे कायदे पूर्णपणे UCC च्या बाहेर ठेवले आहे. देशभरात जिथे जिथे भाजप UCC आणेल तिथे आदिवासींना बाहेर ठेवून त्याची अंमलबजावणी करेल, असेही अमित शाह म्हणाले.
रांची येथील रॅलीला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा समाचार घेतला. ते म्हणाले, “झारखंडमधील ही निवडणूक केवळ सरकार बदलण्याची निवडणूक नाही, तर झारखंडचे भविष्य सुरक्षित करण्याचीही निवडणूक आहे. झारखंडच्या महान जनतेला हे ठरवायचे आहे की त्यांना भ्रष्टाचारात बुडलेले सरकार हवे आहे की पंतप्रधान मोदींच्या वाटेवर चालायचे आहे. विकासाच्या मार्गावर आम्हाला भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार हवे आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.