माझ्या लाडक्या बहिणीना, खास करून भाऊबीजेच्या शुभेच्छा देतो. आता तुम्हाला केवळ वर्षालाच नव्हे तर, दर महिन्याला भाऊबीज मिळणार आहे. माहेरचा आहेर दर महिन्याला तुम्हाला मिळणार आहे. आम्ही देणारे आहोत. हे विरोधी पक्षाचे नेते लाडकी बहीण योजना बंद होईल, ही योजना आम्ही बंद करू, असे म्हणतात. खोडा घालणाऱ्यांना तुम्ही जोडा दाखवणार की नाही?, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanath Shinde) यांनी मतदारांना केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanath Shinde) यांनी कुर्ला विधानसभा मतदारसंघात सभा घेत प्रचाराचा नारळ फोडला आहे. एकनाथ शिंदे यांनी कुर्ला मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. दरम्यान महायुतीची देखील ही पहिलीच प्रचारसभा होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार निशाण साधला आहे.
लाडकी बहीण योजनेच्या विरोधात विरोधक उच्च न्यायालयातही गेले. न्यायालयाने त्यांना चांगलेच झापले. कॉँग्रेस आणि महाविकास आघाडीचे लोक नागपूर खंडपीठात देखील ही योजना बंद करण्यासाठी गेले. आता तर यांचे सरकार आले तर या योजना बंद करू असे हे म्हणत आहेत. त्यांना वाटत असेल लाडकी बहिणीला पैसे देणारा गुन्हेगार आहे, तर असे मी असा गुन्हा १० वेळा करण्यासाठी तयार आहे. आम्ही लाडक्या बहीण योजनेचे पैसे वाढवू, या लाडक्या भावाकडून वर्षाला एकदा नव्हे तर दर महिन्याला भाऊबीज मिळेल, असेही मुख्यमंत्री शिंदे (CM Ekanath Shinde) म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुर्ला येथील सभेत बोलताना म्हणाले, मंगेश कुडाळकर हे ओपनिंग बॅट्समन झालेले आहेत. आता तुम्हाला या मॅचमध्ये चौकार-षटकार मारायचे आहेत. तर बाकी लोकांना क्लीन बोल्ड आणि डिपोझिट गुल करायचे आहे. दिवाळी आहे. फटाके फुटत आहेत. मात्र २३ तारखेला आपला ॲटम बॉम्ब फुटणार आहे. आता पुढील काही दिवस महायुतीच्या सभा होतील, असेही मुख्यमंत्री शिंदे (CM Ekanath Shinde) म्हणाले.
Join Our WhatsApp Community