उमेदवारी अर्ज मागे घ्यायला अवघे काही तास उरले असताना विदर्भात (Vidarbha) मविआमध्ये जो बंडखोरांनी उच्छाद मांडला आहे, तो थांबण्याचे नाव घेत नाही. विशेष म्हणजे यातील सर्वाधिक बंडखोर काँग्रेसचे असून ते काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांसह जिथे जिथे उबाठा आणि राष्ट्रवादी (शप)चे उमेदवार उभे आहेत त्यांच्याही मतदारसंघात बंडखोरी करणार आहेत. त्यामुळे विदर्भात मविआतील तिन्ही प्रमुख पक्षांचे टेन्शन वाढले आहे.
काँग्रेसला जागा न मिळाल्याने पदाधिकारी नाराज झाले असून त्यांनी पक्षविरोधी काम करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसचे उमेदवार असलेल्या इतर जागांवर याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मविआच्या नेत्यांनी आपापल्या पक्षांतील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. जागावाटपासाठी चाचपणी करण्याचा हा मुळ उद्देश होता. परंतू, झाले उलटेच, मुलाखत दिलेल्या सर्वांच्याच मनात तिकीट मिळण्याची आशा निर्माण झाली आणि ते निवडणुकीच्या तयारीला लागले. आता तिकीट न मिळाल्याने माघार कशी घ्यायची, पैसा, ताकद तर खर्ची पडली यामुळे हे इच्छुक आता माघार नाही या आवेशानेच निवडणुकीत उतरले आहेत. (Vidarbha)
(हेही वाचा ‘लाडकी बहीण’ सारख्या कल्याणकारी योजनेत खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा; CM Ekanath Shinde यांचे आवाहन)
काँग्रेसचे बंडखोर कोणत्या मतदारसंघात करणार बंडाळी?
- नागपूर पूर्व – पुरुषोत्तम हजारे
- सावनेर- अमोल देशमुख
- काटोल- राजश्री जिचकार
- उमरेड- मिलींद सुटे
- रामटेक- राजेंद्र मुळक
- बल्लारपूर- डॉ. अभिलाषा गावतुरे
- भंडारा- प्रेमसागर गणवीर, मनोज बागडे
- तुमसर- अनिल बावनकर
- साकोली- मनोज बागडे
- अर्जुनी मोरगाव- अजय लांजेवार
- आमगाव- अनिल कुमरे
- गडचिरोली- डॉ. सोनल कोवे, विश्वजीत कोवासे
- आरमोरी- शिलू चिमूरकर
- अहेरी- हनुमंत मडावी
- दर्यापूर- गुणवंत देवपारे, रामेश्वर अभ्यंकर
- उमरखेड- संजय खाडे
- वर्धा- डॉ. सचिन पावडे, सुधीर पांगुळ
- अकोला पश्चिम- मदन भरगड
- अकोला पूर्व- डॉ. सुभाष कोपरे
- मेहकर- लक्ष्मण घुमरे
- मलकापूर – हरिष रावळ
- कारंजा- ज्योती गणेशपुरे