विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) आचारसंहिता काळात राज्यात विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत आतापर्यंत सुमारे १८७ कोटीरुपयांची मालमत्ता ताब्यात घेण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक विभागाचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी (Dr. Kiran Kulkarni) यांनी दिली आहे. राज्यात स्थिर व फिरते पथक मिळून सुमारे पाच हजार पथके कार्यरत आहेत. शिवाय पोलिस, दारू, उत्पादनशुल्क विभाग व इतर विभागांनी ही कारवाई केलीआहे.
(हेही वाचा-Vidarbha मध्ये मविआचे टेन्शन वाढले; बंडखोरांमुळे काँग्रेससह, उबाठा आणि शरद पवारही अस्वस्थ)
“राज्यात सी-विजील ॲपवर १ हजार ६४८आचारसंहिता भंगाच्या तक्रारी आल्या असून,पैकी १ हजार ६४६ तक्रारींवर १०० मिनिटांच्याआत कारवाई झाल्याचेही त्यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत हजार पुरुषांमागे९३६ स्त्री मतदार आहेत. तृतीय पंथीय मतदारांनी या निवडणुकीत मतदान (Maharashtra Assembly Election 2024) करून मुख्य प्रवाहातयेणे गरजेचे आहे. या निवडणुकीत नवमतदारांची भूमिका फार महत्वाची ठरणार आहे. त्यांचा उत्साहही चांगला आहे.”
(हेही वाचा-UCC निश्चितपणे लागू होणार; Amit Shah यांची मोठी घोषणा)
“जनतेला आपला शासक निवडायचा असतो. काही देशांत शासन निवडण्याचा अधिकार जनतेला नाही, मात्र भारतात मात्र आपल्याला पाहिजेत्या व्यक्तीला आपण मतदान करता येते. मतदानाचा अधिकार लोक बजावत नाहीत, हे दुर्दैव आहे. ईव्हीएम मशीन तंतोतंत बरोबर असतात. त्यात घोळ करता येत नाही. अपूर्ण माहितीच्या आधारे आरोप केले जातात. जगात आपणच ईव्हीएमवर मतदान करतो,” हीअभिमानाची गोष्ट असल्याचेही डॉ. कुलकर्णी म्हणाले आहेत. (Maharashtra Assembly Election 2024)
(हेही वाचा-आम्ही Vote देऊ शकत नाही, पण तुम्ही द्या; विद्यार्थ्यांची पालकांना साद)
शहरी भागात मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी मुंबई, पुणे, नागपूरसारख्या मोठ्या शहरांमध्ये सोसायटी मध्येच मतदान केंद्र देण्याबाबत परवानगी दिली आहे. राज्यात १ हजार १८५ मतदान केंद्राला मान्यता देण्यात आली आहे. मतदानाचा दिवस सुटीला जोडून आला की मतदार ट्रीपला जातात. मतदानाच्या दिवशी जागरूक होण्यापेक्षा मतदारांनी आधीच जागरूक व्हावे. असंही डॉ. कुलकर्णी म्हणाले. (Maharashtra Assembly Election 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community