Rohit Patil यांच्या कार्यकर्त्यांनी दिवाळी फराळातून वाटली ३००० रुपयांची पाकिटे; गुन्हा दाखल

145
Rohit Patil यांच्या कार्यकर्त्यांनी दिवाळी फराळातून वाटली ३००० रुपयांची पाकिटे; गुन्हा दाखल
Rohit Patil यांच्या कार्यकर्त्यांनी दिवाळी फराळातून वाटली ३००० रुपयांची पाकिटे; गुन्हा दाखल

सांगलीतील तासगाव शहरात रोहित पाटील (Rohit Patil) यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना पैसे आणि दिवाळीचा फराळ वाटल्याचा आरोप संजय काका पाटलांच्या कार्यकर्त्यांनी केला होता. याप्रकरणी आता निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त भरारी पथकाने कारवाई केलेय.. राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) पक्षाच्या दोन कार्यकर्ते सचिन उर्फ बाबजी गणपतराव पाटील आणि बाबासाहेब उर्फ खंडू निवृत्ती कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मतदारांना पैसे आणि दिवाळीचा फराळ वाटप करत आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल गुन्हा नोंद करण्यात आलाय.

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024: आचारसंहिता काळामध्ये संपूर्ण‎ राज्यभरात १८७ कोटींची मालमत्ता ताब्यात‎; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती)

रविवार, 3 नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी तासगाव (tasgaon vidhan sabha) येथील साठेनगर भागात विधानसभा निवडणुकीच्या (maharashtra assembly election 2024) पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित आर. आर. पाटील (Rohit Patil) यांच्या कार्यकर्त्यांनी फराळाच्या पाकिटातून ३००० रुपये वाटल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी रुपये पाचशे रुपयांच्या 111 नोटा आणि पाच हजार रुपये रोख अशी एकूण 1 लाख 8 हजार 500 रुपये इतकी रक्कम आढळून आली.

काय आहे प्रकरण ?

3 नोव्हेंबर या दिवशी रोहित पाटील यांच्या पदयात्रेच्या पाठीमागे सचिन उर्फ बाबजी गणपतराव पाटील (वय 48 वर्षे), तासगाव आणि बाबासाहेब उर्फ खंडू निवृत्ती कदम (वय 35 वर्षे) तासगाव हे काही घरांमध्ये ये-जा करत होते. पदयात्रा पाहण्यासाठी गेलेले आणि घटनेचे साक्षीदार राजेंद्र उर्फ गणेश मोहन चव्हाण राहणार भवानीनगर, चिंचणी ता. तासगाव जि. सांगली यांना संशय आल्याने त्यांनी खात्री केली असता मतदारांना रोख रक्कम आणि वस्तू वाटप होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी काही सहकार्‍यांना त्या ठिकाणी बोलावून घेतले.

16 पाकिटांतील 1 लाख 8 हजार 500 रुपये रक्कम जप्त

सचिन उर्फ बाबजी गणपतराव पाटील यांना विचारले असता त्यांनी मी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पार्टीचे विधानसभेचे उमेदवार रोहित पाटील यांचे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाला मतदान करण्यासाठी साठेनगर तासगाव येथील मतदारांना फराळाचा एक बॉक्स आणि तीन हजार रुपयांचे पाकीट देत होतो. माझ्या खिशात अजूनही बाकीचे आहेत, असे सांगून पाकिटे दाखवली. भरारी पथकाला फोन आल्यानंतर भरारी पथकाने साठे नगर येथे जाऊन चौकशी केली, त्या वेळी सर्व जण पोलीस स्टेशन तासगाव येथे गेले असल्याचे समजले. भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी याबाबत सक्षम अधिकाऱ्याचा परवाना आहे का, असे विचारले असता त्यांनी असा कोणताही परवाना काढला नाही असे सांगितले. भरारी पथकाने झडती घेतली असता त्याच्याकडे पांढऱ्या रंगाचे 16 पाकिटे त्यामध्ये प्रत्येकी तीन हजार रुपये पाचशे रुपयांच्या 111 नोटा आणि पाच हजार रुपये रोख अशी एकूण 1 लाख 8 हजार 500 रुपये इतकी रक्कम आढळून आली.

आदर्श आचारसंहितेचा भंग

पोलिसांनी या वेळी कार्यकर्त्यांकडे असलेला एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला. याप्रकरणी दोघांची चौकशी केली असता शरद पवार यांची राष्ट्रवादी पार्टीचे विधानसभेचे उमेदवार रोहित पाटील (Rohit Patil) यांचे तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हाला मतदान करण्यासाठी साठेनगर येथील मतदारांना फराळाचा एक बॉक्स आणि तीन हजार रुपयांचे आमिष दाखवून तो फराळाचा बॉक्स आणि तीन हजार रुपये असलेली पाकिटे देत असताना मिळून आल्याने त्यांना आदर्श आचारसंहितेचा भंग केला आहे. तासगाव पोलिसांनी पूर्ण चौकशी व तपास करून फिर्याद दाखल करून घेतली. दरम्यान पैसे वाटणाऱ्या दोघांना पोलीस स्टेशन येथे आल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी जमा झाले होते.

विधानसभेचे उमेदवार संजयकाका पाटील यांनीही पोलीस स्टेशनमध्ये येऊन पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पैसे वाटताना सापडलेला सचिन उर्फ बाबजी गणपतराव पाटील याला चौकशी सुरू असताना छातीत दुखण्याचा त्रास सुरू झाल्याने त्याला तासगाव येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी हलविण्यात आले. रात्री उशिरा फिर्याद घेऊन गुन्हा नोंद करण्यात आला. सचिन पाटील व खंडू कदम या दोघांना आज सकाळी 11 वाजता हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.