मराठा आरक्षणाची मागणी करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. रविवारी (३ नोव्हे.) जरांगेंनी निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केल्यानंतर ते आज (४ नोव्हे.) आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी या निवडणुकीमधून माघार घेतली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
(हेही वाचा-Bengaluru Consumer Court: तरुणासाठी वधू न शोधल्यामुळे मॅट्रिमोनियल पोर्टलला न्यायालयाचा दणका!)
छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले की, “मनोज जरांगे यांनी जो निर्णय घेतला त्याचं मी स्वागत करतो. देर आए दुरुस्त आए, एका समाजावर निवडणूक लढता येत नाही. मराठा समाजाचे लोक आता मोकळेपणाने राहतील. कुठलेही दडपण येणार नाही. मराठा समाजाचे 60 ते 70 टक्के उमेदवार आहेत. जरांगे यांचा निर्णय अतिशय योग्य आहे.” असं भुजबळ म्हणाले. (Chhagan Bhujbal)
(हेही वाचा-Canada: कॅनडातील हिंदू मंदिरावर खलिस्तानींचा हल्ला; VIDEO व्हायरल)
दलित आणि मुस्लीम उमेदवारांची यादी न आल्याने निर्णय घेतल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. याबाबत विचारले असता छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले की, त्यांनी बोलल्यावर मी काय बोलणार, सर्व धर्मीय आणि सर्व समाजाचा पाठींबा हवा आहे हेच यातून ध्वनित होते. राजकीय पक्षाचा प्रयत्न असाच असतो की, सर्व धर्मीय आणि सर्व समाजामध्ये काम करणे आणि त्यातून निवडून येणे हेच सर्व पक्ष करत असतात.
(हेही वाचा-चीनबरोबरच्या संबंधांमध्ये प्रगतीची अपेक्षा: S Jaishankar)
आरक्षणाचे आंदोलन हा एक सामाजिक प्रश्न आहे. मी समता परिषदेच काम अनेक वर्षांपासून करत आहे. पण आम्ही समता परिषदेच्या माध्यमातून निवडणूक लढवत नाही आणि लढू शकत नाही. कारण निवडणूक लढण्यासाठी त्या उमेदवाराने तिथल्या मतदारांचा विश्वास संपादन करावा लागतो. मी कुठल्यातरी सामाजिक संस्थेचा आहे म्हणून मला मतदान करा, असे होत नाही. त्यामुळे जरांगे यांचे काम सुरु राहील, असे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी म्हटले आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community