राज्याच्या पोलीस महासंचालक Rashmi Shukla यांची बदली

155
राज्याच्या पोलीस महासंचालक Rashmi Shukla यांची बदली
राज्याच्या पोलीस महासंचालक Rashmi Shukla यांची बदली

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची पदावरून बदली करण्यात आली आहे. काँग्रेस आणि उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्या बदलीची मागणी केली होती.

(हेही वाचा – Sada Saravankar यांची माहीममधून कोणती भूमिका घेणार ?; पत्रकार परिषद घेऊन म्हणाले…)

रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्यावर मविआच्या काळात फोन टॅपिंगचा आरोप करण्यात आला होता. नाना पटोले यांनी लिहिलेल्या पत्रानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाला (Central Election Commission) लिहिलेल्या पत्रानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून ही कारवाई करण्यात आली. रश्मी शुक्ला या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय समजल्या जातात.

३ वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पॅनल तयार करण्याचे आदेश

यानंतर राज्याचे जे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत, त्यांच्याकडे पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार सोपवण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ३ वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पॅनल तयार करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. रश्मी शुक्ला यांची सेवा जून 2024 रोजी समाप्त झाली असतानाही भाजप, युती सरकारने जानेवारी 2026 पर्यंत त्यांना नियमबाह्य बढती दिली होती. रश्मी शुक्ला या भाजपला मदत करतात, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.