Rashmi Shukla Transfer : निवडणूक आयोगाविरोधात कांगावा करण्याची आता विरोधकांना संधी मिळणार नाही – माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित

120
Rashmi Shukla Transfer : निवडणूक आयोगाविरोधात कांगावा करण्याची आता विरोधकांना संधी मिळणार नाही - माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित
Rashmi Shukla Transfer : निवडणूक आयोगाविरोधात कांगावा करण्याची आता विरोधकांना संधी मिळणार नाही - माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने निष्पक्षपातीपणे आणि सर्व कायदेशीर बाबींचा विचार करून हा निर्णय घेतला आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित (Praveen Dixit) यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना दिली. (Rashmi Shukla Transfer)

(हेही वाचा – ICC Test Championship : कसोटी अजिंक्यपद अंतिम फेरीसाठी भारताचं आव्हान आता आणखी खडतर)

रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्यावर ‘मविआ’च्या काळात फोन टॅपिंगचा आरोप करण्यात आला होता. नाना पटोले यांनी लिहिलेल्या पत्रानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाला (Central Election Commission) लिहिलेल्या पत्रानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून ही कारवाई करण्यात आली. रश्मी शुक्ला या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय समजल्या जातात.

रश्मी शुक्ला यांच्या बदलीविषयी प्रवीण दीक्षित म्हणाले की, “कुठल्याही प्रकारे कुठल्याही तक्रारीला, संशयाला वाव रहायला नको. निवडणुकीनंतर “आम्ही मागणी केली होती, परंतु आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. निवडणूक आयोग निष्पक्षपाती नाही’, अशा तक्रारींना वाव नको म्हणून निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे. विरोधी पक्षांनी जी मागणी केली होती, ती निवडणूक आयोगाने मान्य केलेली दिसते, येणाऱ्या काळामध्ये देशातील निवडणुका पूर्णपणे निःपक्षपाती पणे होतील, असे सर्वाना वाटेल. असा हा निवडणूक आयोगाचा निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया प्रवीण दीक्षित यांनी दिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.