Muhurat Trading 2024 : मुहूर्ताच्या ट्रेडिंग वेळी काय काळजी घ्यायला हवी?

Muhurat Trading 2024 : मुहूर्ताचं ट्रेडिंग १ तासाचं असल्यामुळे जोखमीचं आहे. 

39
Muhurat Trading 2024 : मुहूर्ताच्या ट्रेडिंग वेळी काय काळजी घ्यायला हवी?
  • ऋजुता लुकतुके

यंदाचं दिवाळीचं मुहूर्ताचं ट्रेडिंग हे सकरात्मक वातावरणातच पार पडलं आणि सेन्सेक्स तसंच निफ्टी निर्देशांकात ०.५ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. पण, एका तासाच्या या सत्रात गुंतवणूकदारांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कारण, कमी अवधीत जोखीम मात्र जास्त आहे. त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांपैकी कमी कालावधीसाठी गुंतवणूक करणाऱ्यांनी अशा सत्राकडे अल्पावधीतील नफा मिळवण्यासाठी विचार करू नये असाच सल्ला तज्ज्ञ देत असतात. (Muhurat Trading 2024)

मुहूर्ताचं ट्रेडिंग ही फक्त भारतातच पाळली जाणारी प्रथा आहे. पण, १९५८ पासून ही परंपरा सुरू झाल्यानंतर जगभरातील संस्था या ट्रेडिंगमध्ये सहभागी होतात. या दिवशी केलेली गुंतवणूक बरकत आणते असा समज असल्यामुळे गुंतवणूकदार छोटीसी का होईना गुंतवणूक या दिवशी करतात. त्यामुळेच मागच्या १७ मुहूर्तांच्या ट्रेडिंग सत्रात फक्त ४ सत्रांमध्ये निर्देशांक खाली आला आहे. बाकी सर्व सत्र ही सकारात्मक होती. भारतीय गुंतवणूकदार शक्यतो या दिवशी खरेदी करतात. (Muhurat Trading 2024)

(हेही वाचा – Uttarakhand : बस दरीत कोसळून 38 जणांचा मृत्यू)

यंदाचं मुहूर्ताचं ट्रेडिंगही सकारात्मक वातावरणात पार पडलं आहे आणि सेन्सेक्स तसंच निफ्टी या दोन्ही निर्देशांकात वाढ झाली आहे. निफ्टी निर्देशांकाने २४,३०० च्या वर पुन्हा एकदा झेप घेतली आहे. पण, हे सत्र हे एक तासाचं विशेष सत्र असतं आणि त्यामागे भावना असतात. बाकी नफा आणि तोट्याची गणितं या सत्रामुळे फारशी ठरत नाहीत. शिवाय एकाच तासाचं सत्र असल्यामुळे अल्पावधीसाठी तसंच एका दिवसासाठी अल्यल्प कालावधीचं ट्रेडिंग करणाऱ्यांना याचा फटकाच जास्त बसू शकतो.

त्याविषयी तज्ज्ञ सावधानतेचा इशारा देताना दिसतात. शेअर बाजार गुंतवणूक तज्ज्ञ योगेंद्र सोमण यांनी म्हटल्याप्रमाणे मूहूर्ताच्या ट्रेडिंगला भावनिक महत्त्व आहे. व्यवहार बाजूला ठेवून खरेदी-विक्री करू नये. ‘एका तासात मोठे उतार चढाव बघायला मिळू शकतात. त्यामुळे किरकोळ गुंतणूकदारांनी या दिवशी शुभकाळ म्हणूनच किरकोळ गुंतवणूक करावी पैसे कमावण्यासाठी या सत्राकडे अजिबात पाहू नये. सकारात्मक वातावरणात पार पडणाऱ्या या गुंतवणुकीत जोखीमही तितकीच असते,’ असं जोशी म्हणाले. (Muhurat Trading 2024)

(हेही वाचा – ICC Test Championship : कसोटी अजिंक्यपद अंतिम फेरीसाठी भारताचं आव्हान आता आणखी खडतर)

यंदाच्या मुहूर्ताच्या ट्रेडिंगच्या वेळी शेअर बाजारात सकारात्मक वातावरण होतं. मागचे पंधरा दिवस बाजार कोसळलेले होते. त्यामुळे मोठ्या कंपन्यांचे शेअर स्वस्तात मिळत होते. त्यामुळे भारतीय नाही तर परकीय गुंतवणूकदारांनीही या मुहूर्ताच्या ट्रेडिंग दरम्यान खरोदी करण्यावर भर दिला. ‘मागच्या २४ वर्षांत १७ सत्र ही लाभदायी ठरली आहेत. पण, इतर ७ सत्रांमध्ये परकीय गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर विक्री केल्यामुळे शेअर बाजार गडगडलेही आहेत. अशावेळी किरकोळ गुंतवणूकदारांना जोखीम न घेता सुरक्षित गुंतवणुकीवर भर द्यावा आणि मुहूर्ताच्या दिवशी अल्पशी गुंतवणूक करून नियमित गुंतवणुकीवर भर द्यावा, असं शेवटी जोशी म्हणाले. (Muhurat Trading 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.