दिल्लीतील प्रदुषणाने सर्व प्रकारचे विक्रम मोडत वायू प्रदुषणाचा उच्चांक गाठला आहे. केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, दि. ३ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील हवेची गुणवत्ता ‘अत्यंत खराब’ श्रेणीमध्ये नोंदवण्यात आली आहे. या दिवशी हवाचे गुणवत्ता निर्देशांक (AQI) ३८२ वर पोहचला आहे. (Delhi)
( हेही वाचा : Article 370 : पहिल्याच दिवशी Jammu and Kashmir विधानसभेत प्रचंड गदारोळ; जाणून घ्या कलम ३७० का ठरला चर्चेचा विषय?)
दिल्लीत (Delhi) कचरा आणि पेंढा जाळण्याचे प्रमाण कमी असूनही हवेने प्रदूषणाची पातळी ओलांडली असल्याने नागरिक चिंतेत आहेत. त्यामुळे दिल्लीच्या प्रदूषणावर बाकीच्या घटकांचाही प्रभाव निर्माण होत आहे. दिल्लीच्या (Delhi) प्रदूषणाला प्रामुख्याने वाहनांमधून बाहेर पडणारा धूर, औद्योगिक उत्सर्जन आणि बांधकामाची धूळ हे घटकही कारणीभूत आहेत. (Air pollution in Delhi)
या प्रदुषणामुळे नागरिकांच्या श्वासोश्वासावर गंभीर परिणाम होताना दिसत आहेत. दिल्लीत ४० हून अधिक स्थानकांची पाहणी करण्यात आल्यानंतर १२ हून अधिक स्थानकात हवेची गुणवत्ता अत्यंत खराब असल्याचे निर्देशनास आले आहे. यामध्ये आनंद विहार,अशोक विहार, बवाना, द्नारकामधील दोन्ही स्थानके, जहांगीरपुरी, मुंडका, नजफगढ, लाजपत नगर, पटपरगंज, विवेक विहार, रोहिणी, पंजाबी बाग आणि वजीरपूर यांचा समावेश आहे. (Delhi)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community