Samajwadi Party इंडी आघाडीमधून बाहेर पडणार?

95
Samajwadi Party इंडी आघाडीमधून बाहेर पडणार?
  • प्रतिनिधी 

हरियाणा निवडणुकीनंतर काँग्रेसचे महत्त्व इंडी आघाडीमध्ये बऱ्यापैकी कमी झाल्याचे दिसून येत आहे. महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रात आपल्याला हव्या तितक्या जागा दिल्या नाही म्हणून समाजवादी पक्षाने (Samajwadi Party) सूड भावनेने झारखंडमध्ये २१ जागावर काँग्रेसच्या विरोधात उमेदवार उभे केले आहेत, यामुळे इंडी आघाडीतून सपा बाहेर पडणार काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.

चार राज्यांच्या निवडणुकीत सपाला (Samajwadi Party) एकही जागा मिळाली नाही लोकसभा निवडणुकीत, सपा देशातील तिसरा सर्वात मोठा पक्ष आणि इंडी आघाडीतील दुसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये जागा न मिळणे हा युतीचा सहकारी म्हणून सपाला मोठा धक्का मानला जात आहे. ज्या जागांवर सपाने उमेदवार उभे केले आहेत त्यात गढवा, बार्डी, मणिका, हुसेनाबाद, भनवथपूर, छतरपूर, विश्रामपूर, जमशेदपूर, बरकाठा, बरकागाव, कानके, पाकूर, महेशपूर, जरमुंडी, राजमहल, बोरियो, सरथ, जमुआ, निरसा, तुंडी आणि बागमारा समावेश आहे.

(हेही वाचा – Assembly Election 2024 : मातोश्री पुढे आता सिल्वर ओकचे वजन वाढत आहे)

सपाला (Samajwadi Party) अपेक्षा होती की महाराष्ट्रात, जिथे त्यांचे दोन आमदार आहेत, त्यांना युतीच्या अंतर्गत किमान जागा मिळतील. पण इथेही त्यांना खाली हात राहावे लागले. सपाने महाराष्ट्रात १२ जागांची मागणी केली होती. त्याचवेळी हरियाणातही सपाला एक जागा हवी होती, पण काँग्रेसने एकही जागा दिली नाही. सपाने हरियाणात निवडणूक लढवली नाही. पण, जम्मू-काश्मीरमध्ये २० उमेदवार उभे केले.

तसेच झारखंडमध्ये काँग्रेसला त्यांच्याच खात्यातून आरजेडीला जागा द्याव्या लागल्या. आघाडीसाठी झारखंडमधील काँग्रेस नेत्यांशी बोलण्याची जबाबदारी समाजवादी पक्षाचे नेते व्यास गौर यांच्याकडे सोपवण्यात आली होती. झारखंडमध्ये काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चासह आरजेडीची आघाडी होती. काँग्रेसने आपल्या कोट्यातील जागा आरजेडीला द्यायला हव्यात असे सांगितले. त्यामुळे ती सपाला (Samajwadi Party) जागा देऊ शकत नाही. यानंतर सपाने येथे आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.