Mahim Assembly मुळे शिवसेनेला पत्करावा लागणार मुंबईतील १२ जागांवर मनसैनिकांचा रोष

135
Mahim Assembly मुळे शिवसेनेला पत्करावा लागणार मुंबईतील १२ जागांवर मनसैनिकांचा रोष
Mahim Assembly मुळे शिवसेनेला पत्करावा लागणार मुंबईतील १२ जागांवर मनसैनिकांचा रोष

गेल्या काही दिवसांपासून माहिम विधानसभा मतदारसंघावरून सुरु असलेला वाद अखेर थंडावला आहे. कारण शिवसेनेचे माहिम मतदारसंघाचे उमेदवार सदा सरवणकर यांनी माहिममधून उमेदवारी मागे घेतलेली नाही. तर दुसरीकडे राज ठाकरेंनी ही माहिममध्ये अमित ठाकरेंच्या विजयासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यामुळे अमित ठाकरेंसाठी माघार न घेतल्याने सरवणकर आणि शिवसेनेविरोधात मनसैनिकांचा राग पत्करावा लागणार असल्याची चर्चा आहे. (Mahim Assembly)

शिवसेने मुंबईतील १६ जागांवर आपले उमेदवार दिले आहेत. तर मनसेने मुंबईत शिवसेनेच्या उमेदवारांविरोधात १२ ठिकाणी उमेदवार दिले आहेत. त्यामुळे या १२ जागांवर आता शिवसेनेला मनसैनिकांचा रोष पत्करावा लागणार आहे. तसेच उर्वरित ४ जागांवर ही मनसे शिवसेनेला मदत करण्याची शक्यता धुसर होत चालली आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून माहिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या सदा सरवणकर यांनी उमेदवारी मागे घ्यावी, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र अखेरच्या क्षणापर्यंत सरवणकर यांनी उमेदवारी मागे घेतली नाही. तसेच राज ठाकरेंनी ही शेवटच्या क्षणी सरवणकरांच्या भेटीला नकार दिला. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवसेना आणि सरवणकर यांच्याविरोधात उभे राहतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मुंबईतील १२ जागांवर मनसैनिक शिवसेनेविरोधात उभे राहणार असल्याचे बोलले जात आहे. (Mahim Assembly)

माहिममुळे या १२ जागांवर शिवसेनेला झेलावा लागणार मनसैनिकांचा रोष

वरळी- मिलिंद देवरा (शिवसेना)- संदीप देशपांडे (मनसे)
माहिम (Mahim Assembly) – सदा सरवणकर (शिवसेना)- अमित ठाकरे (मनसे)
धारावी- राजेश खंदारे (शिवसेना)- (मनसेचा उमेदवार नाही)
कुर्ला – मंगेश कुडाळकर (शिवसेना)- प्रदीप वाघमारे (मनसे)
चांदीवली- दिलीप लांडे (शिवसेना)- महेंद्र भानुशाली (मनसे)
चेंबूर- तुकाराम काठे (शिवसेना) – मोली थोरवे (मनसे)
दिंडोशी – संजय निरुपम (शिवसेना)- भास्कर परब (मनसे)
जोगेश्वरी पूर्व- मनीषा वायकर (शिवसेना)- भालचंद्र अंबुरे (मनसे)
भांडुप पश्चिम- अशोक पाटील (शिवसेना)- शिरीष सावंत (मनसे)
विक्रोळी- सुवर्णा करंजे (शिवसेना)- विश्वजीत डोलम (मनसे)
मानखुर्द शिवाजीनगर- सुरेश पाटील (शिवसेना)- जगदीश खांडेकर (मनसे)
मागाठाणे- प्रकाश सुर्वे (शिवसेना) – नयन का धरण (Mahim Assembly)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.