- ऋजुता लुकतुके
भारताचा ज्येष्ठ फलंदाज के एल राहुल आणि नवोदित यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल हे भारतीय अ संघाकडून खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाले आहेत. मुंबई कसोटीत या दोघांचा भारतीय संघात समावेश नव्हता. त्यामुळे त्यांना विश्रांतीचीही गरज नाही. ऑस्ट्रेलियात खेळण्याचा अनुभवही त्यांना मिळेल म्हणून हा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. ७ नोव्हेंबरला भारत ए विरुद्ध ऑस्ट्रेलिया अ संघांतील सामना होणार आहे. त्यानंतर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी २२ नोव्हेंबरपासून रंगणार आहे. (India’s Tour of Australia)
(हेही वाचा – Ind vs SA, T20 Series : भारतीय टी-२० संघ दक्षिण आफ्रिकेत पोहोचला तो क्षण…)
राहुल आणि जुरेल दोघंही न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतही भारतीय संघात होते. पण, राहुल बंगळुरूची पहिली कसोटी खेळला. त्यानंतरच्या दोन्ही कसोटी तो संघाबाहेर होता. तर जुरेल यातील एकही कसोटी खेळलेला नाही. आता न्यूझीलं विरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने संघातील प्रत्येकाला सरावाचा सामना खेळायला मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जुरेल आणि राहुलला लवकर पाठवणं हा त्यातीलच एक भाग आहे. (India’s Tour of Australia)
(हेही वाचा – Mahim Assembly मुळे शिवसेनेला पत्करावा लागणार मुंबईतील १२ जागांवर मनसैनिकांचा रोष)
के एल राहुल खराब फॉर्मशी झगडतोय आणि पहिल्या कसोतील अपयशानंतर त्याला संघातून डच्चू मिळाला. तर ध्रुव जुरेलने यावर्षी इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत भारतीय संघात पदार्पण केलं. पण, त्यानंतर रिषभ पंत कसोटी संघात परतला. आणि त्यामुळे जुरेलला संधी मिळू शकलेली नाही. आता दोघांचा ऑस्ट्रेलियात थोडाफार सराव व्हावा अशी बीसीसीआयची योजना आहे. २२ नोव्हेंबरच्या मालिकेसाठी भारतीय संघ नोव्हेंबरच्या मध्यावर ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. त्यापूर्वी संघातील खेळाडू रणजी सामना खेळतात का हे आता पहावं लागेल. (India’s Tour of Australia)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community