- ऋजुता लुकतुके
भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. यंदाचा रणजी हंगाम हा त्याचा शेवटचा हंगाम असणार आहे. २०१० ते २०२१ या कालावधीत साहा भारताकडून ४० कसोटी सामने खेळला. तर आयपीएलमध्येही तो १७० सामने खेळला आहे. कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैद्राबाद, पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स या संघांकडून तो खेळला. (Wriddhiman Saha Retires)
‘क्रिकेटमधील माझा सुंदर प्रवास या हंगामा अखेरीस संपणार आहे. बंगालकडून इतकी वर्षं मी खेळू शकलो याचा मला अभिमान आहे. पण, ही शेवटचीच खेप असेल. तुम्ही सगळ्यांनी मला जो पाठिंबा दिलात त्यासाठी तुमचे खूप आभार,’ असं वृद्धिमान साहाने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं आहे. (Wriddhiman Saha Retires)
After a cherished journey in cricket, this season will be my last. I’m honored to represent Bengal one final time, playing only in the Ranji Trophy before I retire. Let’s make this season one to remember! pic.twitter.com/sGElgZuqfP
— Wriddhiman Saha (@Wriddhipops) November 3, 2024
(हेही वाचा – जम्मू काश्मीरचे प्रदेशाध्यक्ष BJP ने बदलले)
२००७ मध्ये त्याने बंगालकडून देशांतर्गत क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि १५ वर्षं तो बंगालच्या रणजी संघाचं प्रतिनिधित्व करत आहे. डिसेंबर २०२१ मध्ये भारतीय संघासाठीचे दरवाजेही त्याच्यासाठी बंद झाले. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना तरुण संघ बांधायचा होता आणि त्यांनी साहाशी चर्चा करून त्याला याची कल्पना दिली. त्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली होती. त्याचवर्षी गुजरात टायटन्स संघाकडून आयपीएल खेळताना त्याने संघाला लीग विजेतेपद मिळवून दिलं. (Wriddhiman Saha Retires)
भारतीय संघाकडून तो ४० कसोटी आणि ९ एकदिवसीय सामने खेळला आणि यात त्याने १००० च्या वर आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. यात ३ शतकांचाही समावेश आहे. महेंद्रसिंग धोनीला तो समकालीन आहे. त्यामुळे तो आणि दिनेश कार्तिक यांचा विचार धोनीला पर्याय म्हणूनच झाला आणि संघात त्यांची जागा अनियनित राहिली. यष्टीरक्षक म्हणून त्याने ९२ झेल आणि ८ यष्टीचितचे बळी मिळवले आहेत. पुढील वर्षी आयपीएलमध्येही साहा दिसणार नाही. (Wriddhiman Saha Retires)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community