India vs NZ, Test Series : न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत भारताकडून झालेल्या चुका

India vs NZ, Test Series : खेळाडूंच्या कामगिरीबरोबरच काही तांत्रिक चुकाही संघाला महागात पडल्या.

90
Ind Vs NZ Test Series : भारतीय फलंदाज डावखुऱ्या फिरकीच्या जाळ्यात कसे अडकले?
Ind Vs NZ Test Series : भारतीय फलंदाज डावखुऱ्या फिरकीच्या जाळ्यात कसे अडकले?
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघाची न्यूझीलंड विरुद्धची कामगिरी लाजिरवाणी होती आणि फलंदाज तसंच गोलंदाजही आपला खेळ उंचावायला कमी पडले. त्यामुळे फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर भारतीय संघावर पराभवाची नामुष्की ओढवली. रोहित आणि विराट सहा डावांत मिळूनही धावांची एकूण शंभरी गाठू शकले नाहीत. तर बुमराहसह अश्विन आणि जडेजानेही षटकामागे ४ पेक्षा जास्त धावा लुटल्या. फलंदाजी कधी एकसंध वाटलीच नाही. पराभवाची आणखीही कारणं देता येतील. पण, तीन कसोटीतील नेमके क्षण पाहूया जिथे भारतीय संघाने वर्चस्वाची संधी गमावली आणि उलट कसोटीही गमावली. (India vs NZ, Test Series)

बंगळुरू कसोटीत प्रथम फलंदाजीचा निर्णय – बंगळुरू कसोटीचा पहिला दिवस पावसाने वाया गेला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी खेळ सुरू झाला तेव्हा नाणेफेक जिंकून रोहित शर्माने प्रथम फलंदाजी घेतली. खेळपट्टीवर तेव्हा दव होतं. आणि त्यामुळे चेंडू चांगलेच स्विंग होत होते, उसळत होते. परिणामी, भारतीय संघ ४६ धावांत सर्वबाद झाला. हा धक्का इतका मोठा होता. दुसऱ्या डावात ४५६ धावा करूनही भारताने ही कसोटी गमावली. प्रथम फलंदाजीचा निर्णय आपला होता, असं रोहितने नंतर बोलून दाखवलं. हा निर्णय चांगलाच अंगलट आला. (India vs NZ, Test Series)

(हेही वाचा – Rohit Sharma : रोहित शर्माच्या नावावर कसोटीतील ‘हा’ नकोसा विक्रम)

बंगळुरूमध्ये दुसऱ्या डावातील हाराकिरी – सर्फराझ आणि रिषभ पंत यांनी दुसऱ्या डावात १७७ धावांची भागिदारी केली होती. त्यामुळे भारतीय संघाने पहिल्या डावातील ३०० धावांची पिछाडीही भरून काढली. पण, ही जोडी फुटल्यावर मात्र उर्वरित ६ फलंदाज ४८ धावांच परतले. त्यामुळे कसोटीवर मिळू लागलेलं वर्चस्व भारताने गमावलं आणि न्यूझीलंडसमोर १२० धावांचं आव्हान उरलं, जे त्यांनी ८ गडी राखून पूर्ण केलं. (India vs NZ, Test Series)

फलंदाज जोडीने बाद होण्याचा शाप – भारतीय फलंदाजी एकूणच या मालिकेत अपयशी ठरली. त्यातही उठून दिसलं ते भागिदारी रचण्यातील अपयश. बंगळुरू कसोटीतील अपवाद वगळला तर एकही शतकी भागिदारी भारतीय फलंदाजांच्या नावावर नाही. शिवाय पुणे कसोटीत पहिल्या डावात न्यूझीलंडला २५९ धावांत गुंडाळल्यावर भारतीय संघाकडे संधी होती मोठी धावसंख्या रचण्याची. निदान पहिल्या डावातील आघाडी भारताला तारू शकली असती. पण, भारतीय संघ उलट १५० मध्येच बाद झाला. पुन्हा एकदा वर्चस्व किवी संघाकडे गेलं. (India vs NZ, Test Series)

(हेही वाचा – Samajwadi Party इंडी आघाडीमधून बाहेर पडणार?)

अश्विनचं अपयश – फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर खेळत असताना फिरकीपटूंची चांगली कामगिरी महत्त्वाची होऊन बसते आणि भारताचा मुख्य फिरकीपटू होता रवीचंद्रन अश्विन. पण, अश्विनने त्याच्या संबंध स्पेलमध्ये एकही बळी मिळवला नाही असं या कसोटीत वारंवार झालं. खासकरून मुंबई कसोटीत त्याचं गोलंदाजीचं पृथ:करण होतं ४७ धावा आणि ० बळी. फिरकीपटू नेहमी जोडीने चांगली कामगिरी करतात असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. दोन्ही बाजूंनी दडपण असावी असा एक सिद्धांत आहे. यंदा अश्विन आणि जडेजा अशा दोघांचीही कामगिरी त्या पद्धतीने झाली नाही. दोघांनाही सत्रांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करता आली नाही. (India vs NZ, Test Series)

रोहित-विराटचं अपयश – रोहित शर्मा आणि विराट कोहली हे भारतीय फलंदाजीचा कणा आहेत. यशस्वी, शुभमन, सर्फराझ या नवीन खेळाडूंना त्यांच्याकडून शिकायला मिळावं अशी संघ प्रशासनाची अपेक्षा असताना दोघंही फॉर्मसाठी चाचपडताना दिसले. सहा डावांत मिळून दोघांनी प्रत्येकी शंभर धावाही केल्या नाहीत. तिथं भारताची फलंदाजी दुबळी झाली. (India vs NZ, Test Series)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.