- ऋजुता लुकतुके
न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघाची आता नजर असेल ती बोर्डर गावस्कर चषकावर. न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवामुळे भारताचं गेल्या १८ मायदेशातील मालिकांमध्ये असलेलं वर्चस्व मोडीत निघालं. आता बोर्डर-गावस्कर चषकातील यशही पटावर लागलं आहे. २०१४ पासून हा चषक भारताकडेच आहे आणि त्यासाठी अगदी ऑस्ट्रेलियातही दोन मालिका भारतीय संघाने जिंकल्या आहेत. आता हा चषक राखून ठेवण्याची जबाबदारी रोहित शर्माच्या संघावर आहे. (Border-Gavaskar Trophy 2025)
शिवाय बोर्डर-गावस्कर चषकात भारतीय संघाचं कसोटीतील वर्चस्वही पणाला लागलं आहे. आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आतापर्यंत राखलेलं अव्वल स्थान भारताने आता गमावलंय. दुसरं स्थान कायम राखण्यासाठीही ऑस्ट्रेलियात विजय आवश्यक आहे. फलंदाज आणि गोलंदाजांना त्यासाठी आपली कामगिरी उंचवावी लागणार आहे. (Border-Gavaskar Trophy 2025)
(हेही वाचा – Rohit Sharma : रोहित शर्माच्या नावावर कसोटीतील ‘हा’ नकोसा विक्रम)
भारताच्या न्यूझीलंड विरुद्धच्या ०-३ अशा पराभवानंतर आता भारताला ऑस्ट्रेलियातील ही मालिका ४-१ किंवा ४-० अशी जिंकावी लागणार आहे. तर भारताचं कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील स्थान निर्विवादपणे अबाधित राहील. कारण, भारताच्या पराभवामुळे अचानक न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यासाठी अजिंक्यपद अंतिम फेरीचे दरवाजे खुले झाले आहेत. आणि वर्षभरात नव्हती इतकी चुरस हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात निर्माण झाली आहे. (Border-Gavaskar Trophy 2025)
रोहित शर्मा, विराट कोहली या अनुभवी फलंदाजांकडून संघाला आता आशा असतील. आणि जसप्रीत बुमराह, सिराज हे तेज गोलंदाज चांगली कामगिरी करतील अशी आशा बाळगता येईल. बोर्डर गावस्कर चषकासाठीचा भारतीय संघ आणि मालिकेचं वेळापत्रक पाहूया, (Border-Gavaskar Trophy 2025)
(हेही वाचा – India’s Tour of Australia : के एल राहुल, ध्रुव जुरेल भारतीय अ संघाकडून ऑस्ट्रेलियात खेळणार)
बोर्डर-गावस्कर चषकासाठी भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, सर्फराझ खान, के एल राहुल, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, आकाशदीप सिंग, हर्षित राणा, नितिश रेड्डी व प्रसिध कृष्णन (Border-Gavaskar Trophy 2025)
राखीव खेळाडू – मुकेश कुमार, नवदीप सैनी व खलिल अहमद
बोर्डर-गावस्कर चषक वेळापत्रक – २२ नोव्हेंबर (पर्थ कसोटी)
६ डिसेंबर – ॲडलेड कसोटी (दिवसरात्र)
१४ डिसेंबर – ब्रिस्बेन कसोटी
२६ डिसेंबर – मेलबर्न कसोटी
३ जानेवारी – सिडनी कसोटी
हेही पहा –
Join Our WhatsApp Community