फोडाफोडीच्या राजकारणाचे आद्य शरद पवार; आता पक्ष आणि चिन्हही ताब्यात घेतात; Raj Thackeray यांचा घणाघात

271
फोडाफोडीची सुरुवात शरद पवारांनी केली. १९७८ ला काँग्रेस फोडली, १९९२ ला शिवसेना फोडली, २००५ ला नारायण राणे फोडले. आता फोडाफोडीचे राजकारण राहिले नाही आता पक्ष, चिन्ह ताब्यात घ्यायचे हे पहिल्यांदा बघितले, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी डोंबिवलीतील पहिल्या प्रचारसभेत बोलताना हल्लाबोल केला.
शिवसेना नाव आणि धनुष्यबाण ही ना उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी, ना एकनाथ शिंदेंची…ती बाळासाहेबांची प्रॉपर्टी…माझे कितीही मतभेद असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ हे अपत्य शरद पवारांचे आहे, असेही राज ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्यानंतर सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट घडली ती बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोमधून हिंदुहृदयसम्राट लिहिलेले काढले. काही फोटो उर्दुत बघितले, त्यात जनाब बाळासाहेब ठाकरे हे लिहिलेले होते. स्वत:च्या स्वार्थासाठी इथपर्यंत खालच्या पातळीत गेलात, अशी टीका राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

आधी का बोलला नाहीत? 

२०१९ ची निवडणूक एका बाजूला शिवसेना-भाजपा आणि त्यांच्यासमोर काँग्रेस-राष्ट्रवादी अशी झाली. निकाल लागले मग सकाळचा एक शपथविधी झाला. ते लग्न दोन दिवसांत तुटले कारण काकांनी डोळे वटारले. मग लगेच घरी आले. काका मला माफ करा…मग ज्यांच्याविरोधात निवडणूक लढवली त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे गेले. मला अमित शाहांनी अडीच वर्षाचे मुख्यमंत्रिपद देतो ही हमी दिली म्हणाले. कुठे चार भिंतीत…उद्धव ठाकरेंसमोर व्यासपीठावर नरेंद्र मोदींनी आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील हे सांगितले. अमित शाहांनी भाषणात सांगितले त्यावेळी आक्षेप का घेतला नाही. निकाल लागेपर्यंत कुणी काही बोलेना. २०१९ चा निकाल लागला. आमच्याशिवाय सरकार बसू शकत नाही तेव्हा यांनी पिळायला सुरूवात केली. मुख्यमंत्रिपद द्या नाहीतर आम्ही जातो. वेगळ्या विचारांची आघाडी झाली असा सवाल राज ठाकरेंनी (Raj Thackeray) उद्धव ठाकरेंना केला.

मुली नाचवणारा महाराष्ट्र नाही 

मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या व्यासपीठावर भोजपुरी गाण्यावर बाई नाचते. एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे, उमेदवाराचे नाव आहे. ही लाडकी बहीण योजना आहे का? आपण कुठे चाललोत…व्यासपीठावर असे प्रकार इथले नाही. हे उत्तर प्रदेश, बिहारमध्ये होते. मुख्यामंत्र्यानी यात वैयक्तिक लक्ष घातले पाहिजे. आमच्या सगळ्या राजकीय पक्षांपेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. जर महाराष्ट्र बर्बाद झाला तर छत्रपती शिवरायांचे नाव घेता येणार नाही. अटकेपार झेंडे फडकवणारा महाराष्ट्र व्यासपीठावर मुली नाचवणारा नाहीअसेही राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.