Assembly Election 2024 : मुंबई उपनगरातील २६ विधानसभा मतदारसंघात ३१५ उमेदवार निवडणूक रिंगणात,५३ जणांची माघार

607
Assembly Election 2024 : अमरावती जिल्ह्यात आठ मतदारसंघात १६० उमेदवार रिंगणात
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ विधानसभा मतदारसंघांमध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी सोमवारी उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर अखेरच्या दिवशी ५३ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे या निवडणुकीत अंतिम ३१५ उमेदवार रिंगणात कायम असल्याची माहिती मुंबई उपनगर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर (Rajendra Kshirsagar) यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Assembly Election 2024)

१७१- मानखुर्द आणि १५८- जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी २२ उमेदवार आहेत. १६७- विलेपार्ले व १७३- चेंबूर विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी ६ उमेदवार आहेत.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ विधानसभा मतदारसंघांमध्ये २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

(हेही वाचा – Border-Gavaskar Trophy 2025 : आता नजर बोर्डर-गावस्कर मालिकेवर)

उपनगर जिल्ह्यातील उमेदवार संख्या

अर्ज भरलेले उमेदवार : ४७८

नामंजूर अर्ज : ११०

वैध उमेदवारांची संख्या : ३६८

माघार घेतलेल्या उमेदवारांची संख्या: ५३

निवडणूक लढविणा-या उमेदवारांची संख्या: ३१५

> सर्वात कमी उमेदवार : ०६ (१६७ विलेपार्ले, १७३ चेंबुर विधानसभा मतदार संघ)

> सर्वात जास्त उमेदवारः २२ (१५८ जोगेश्वरी, १७१ मानखुर्द विधानसभा मतदार संघ)

उमेदवारांची वर्गवारी

मान्यताप्राप्त : ९५

नोंदणीकृत : १०६

अन्य : ११४

एकूण : ३१५

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.