Muhurat Trading : मूहूर्ताचं ट्रेडिंग कसं करायचं? त्यासाठी काय आहेत टिप्स?

मूहूर्ताचं ट्रेडिंग जोखमीचं असतं त्यामुळे सावधानतेनं करण्याचा सल्ला तज्ज देतात.

76
Muhurat Trading : मूहूर्ताचं ट्रेडिंग कसं करायचं? त्यासाठी काय आहेत टिप्स?
Muhurat Trading : मूहूर्ताचं ट्रेडिंग कसं करायचं? त्यासाठी काय आहेत टिप्स?
  • ऋजुता लुकतुके

मूहूर्ताचं ट्रेडिंग (Muhurat Trading) आता पार पडलं आहे. आणि यंदाही नेहमीप्रमाणे खरेदीदारांनी उत्साह दाखवला. दिवाळीच्या पुढच्या आठवड्यात घसऱणीने सुरूवात झाली असली तरी मूहूर्ताचं ट्रेडिंग (Muhurat Trading) हे सकारात्मक वातावरणात पार पडलं. दोन्ही निर्देशांक ०.५ टक्के वाढीसह बंद झाले. हा उत्साह बघून अनेकांना वाटतं की, ही संधी आहे. आणि ती हातची जाता कामा नये. यासाठी निव्वळ उत्साह आणि कुठलंही ज्जान न मिळवता गुंतवणूकदार शेअर बाजारात गुंतवणूक करतात. आणि तज्ज नेमके त्याचविरोधात सल्ले देतात.

‘दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मूहूर्ताचं ट्रेडिंग (Muhurat Trading) आहे. या काळातील गुंतवणूक वर्षभरासाठी बरकत आणते असा समज आहे. पण, कमी कालावधीतील गुंतवणुकीसाठी ही वेळ योग्य नाही. आताही शनिवारी मूहूर्ताचा बाजार ०.५ टक्के वर होता. तोच सोमवारी ३ टक्क्यांनी खाली आला आहे. तेव्हा जोखीम समजून घेऊनच गुंतणूक करावी,’ असं गुंतवणूक तज्ज रवींद्र जंगम यांनी म्हटलं आहे.

(हेही वाचा – Sada Saravankar हेच महायुतीचे उमेदवार; आशिष शेलारांनी स्पष्ट केली माहिमविषयीची भूमिका)

शिवाय मूहूर्ताचं ट्रेडिंग (Muhurat Trading) ही भावना आहे. आणि त्या एका तासानंतर नियमित ट्रेडिंगचे दिवस सुरू होतात. त्यामुळे दीर्घकालीन विचार करूनच गुंतवणूक करावी असाच सल्ला तज्ज देतात. ‘सध्या मंदीचं वातावरण आहे. मध्य आशियातील युद्धाचे वारे, अमेरिकन निवडणुकीची सध्याची अनिश्चितता यांची झालर याला आहे. त्यामुळे उलट गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगण्याची गरज आहे. वायदे बाजारात सोने-चांदीच्या दरातही घसरण होत आहे. आणि वातावरणातील अनिश्चितता शेअर बाजारातही आहे,’ असं जिओजीत फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य सल्लागार डॉ व्ही के विजयकुमार यांनीही म्हटलं आहे.

यंदाच्या मूहूर्ताच्या ट्रेडिंगच्या (Muhurat Trading) वेळी शेअर बाजारात सकारात्मक वातावरण होतं. मागचे पंधरा दिवस बाजार कोसळलेले होते. त्यामुळे मोठ्या कंपन्यांचे शेअर स्वस्तात मिळत होते. त्यामुळे भारतीय नाही तर परकीय गुंतवणूकदारांनीही या मूहूर्ताच्या ट्रेडिंग (Muhurat Trading) दरम्यान खरोदी करण्यावर भर दिला. ‘मागच्या २४ वर्षांत १७ सत्र ही लाभदायी ठरली आहेत. पण, इतर ७ सत्रांमध्ये परकीय गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर विक्री केल्यामुळे शेअर बाजार गडगडलेही आहेत. अशावेळी किरकोळ गुंतवणूकदारांना जोखीम न घेता सुरक्षित गुंतवणुकीवर भर द्यावा. आणि मूहूर्ताच्या दिवशी अल्पशी गुंतवणूक करून नियमित गुंतवणुकीवर भर द्यावा, असं शेवटी विजयकुमार म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.