- ऋजुता लुकतुके
आयपीएलच्या मेगा लिलावापूर्वी सर्व संघांनी त्यांना कायम ठेवायच्या खेळाडूंची यादी आयपीएलला सादर केली आहे. यात गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सनी सहा खेळाडूंना कायम ठेवण्याची मर्यादा पूर्णपणे वापरली आहे. त्यांनी सुनील नरेन, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती तसंच रमणदीप सिंग आणि हर्षित राणा या सहा खेळाडूंना कायम ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. यापैकी रिंकू सिंगसाठी त्यांनी १३ कोटी रुपये मोजले. बाकी रसेल, नरेन आणि चक्रवर्ती यांच्यासाठी प्रत्येकी १२ कोटी रुपये तर रमणदीप आणि हर्षित राणा या अननुभवी खेळाडूंसाठी प्रत्येकी ४ कोटी रुपये मोजले. म्हणजे या सगळ्याचा खर्च झाला ५७ कोटी रुपये इतका झाला. (IPL Retentions 2024)
आणि लिलावापूर्वी प्रत्येक संघाकडे १२० कोटी रुपयांची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. आता कोलकाता संघाने ५७ कोटी रुपये वापरल्यावर त्यांच्याकडे ६३ कोटी रुपये उरायला हवे होते. पण, त्यांच्याकडे मेगा लिलावासाठी फक्त ५१ कोटी रुपयेच शिल्लक राहणार आहेत. असं का ते समजून घेऊया. (IPL Retentions 2024)
(हेही वाचा – Mumbai Crime : दक्षिण मुंबईतील हॉटेलच्या खोलीत सुरतच्या व्यापाऱ्याच्या मृतदेहासोबत आढळून आली १४ वर्षाची मुलगी)
खेळाजू कायम ठेवण्याचे हे नियम आयपीएलने ठरवून दिले होते त्यानुसार, पहिला खेळाडू कायम ठेवण्याची किंमत १८ कोटी रुपये होती. दुसरा खेळाडू कायम ठेवण्याची किंमत होती १६ कोटी रुपये तर तिसरा खेळाडू कायम ठेवण्याची किंमत ११ कोटी रुपये होती. पुन्हा एकदा चौथा खेळाडू कायम ठेवण्याची किंमत होती १८ कोटी रुपये. तर अननुभवी खेळाडू राखून ठेवण्याची किंमत प्रत्येकी ४ कोटी रुपये होती. आणि तो हिशोब कोलकाता नाईट रायडर्ससाठी लावण्यात आला आहे. ही बेरित ६९ कोटी रुपये इतकी होते. (IPL Retentions 2024)
तेवढे पैसे कोलकाता संघाच्या एकूण उपलब्ध १२० कोटी रुपयांमधून कमी करण्यात आले आहेत. उर्वरित ५१ कोटी रुपये कोलकाता संघाकडे लिलावाच्या दिवशी उपलब्ध असतील.
(हेही वाचा – ‘बटेंगे तो कटेंगे’ योगींचा संदेश महाराष्ट्रालाही लागू; महंत Ramgiri Maharaj यांचा हिंदूंना सावधानतेचा इशारा)
कोलकाता संघाने खर्च केलेले पैसे
पहिला कायम ठेवलेला खेळाडू – रिंकू सिंग (१३ कोटी)
दुसरा कायम ठेवलेला खेळाडू – आंद्रे रसेल (१२ कोटी)
तिसरा कायम ठेवलेला खेळाडू – सुनील नरेन (१२ कोटी)
चौथा कायम ठेवलेला खेळाडू – वरुण चक्रवर्ती (१२ कोटी)
पाचवा कायम ठेवलेला खेळाडू – रमणदीप सिंग (४ कोटी)
सहावा कायम ठेवलेला खेळाडू – हर्षित राणा (४ कोटी)
पण, या प्रक्रियेत कोलकाता संघाने उपलब्ध पैशातून ६९ कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यांच्याकडे ५१ कोटी रुपये शिल्लक राहिले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community