महायुतीच्या प्रचारसभांचा नारळ कोल्हापुरात फुटणार ; उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis ६ दिवसात घेणार २१ सभा

29
महायुतीच्या प्रचारसभांचा नारळ कोल्हापुरात फुटणार ; उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis ६ दिवसात घेणार २१ सभा
महायुतीच्या प्रचारसभांचा नारळ कोल्हापुरात फुटणार ; उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis ६ दिवसात घेणार २१ सभा

राज्यात विधानसभा निवडणुकीला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. यातच आता सर्वच राजकीय पक्षांनी प्रचार सभांचा धडाका लावला आहे. दरम्यान, मंगळवार ११ नोव्हेंबर रोजी सत्ताधारी पक्षातील राजकीय मंडळी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. तर प्रचार सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री महायुतीच्या प्रचार सभेसाठी उपस्थित राहणार आहेत.आगामी काळात नेत्यांनी प्रचारकाचा धडाका लावला आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) पुढील 6 दिवसात 21 सभा घेणार आहेत. (Devendra Fadnavis)

मुख्यमंत्री हे सुरुवातीला पट्टणकोडोली आणि शिरोळ या ठिकाणी सभा घेणार आहेत आणि त्यानंतर कोल्हापूर शहरामध्ये महायुतीची सभा होणार आहे.या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.   

(हेही वाचा – हिंदू मंदिरावर जाणीवपूर्वक हल्ला; PM Modi यांच्याकडून तीव्र शब्दांत निषेध)

देवेंद्र फडणवीसांकडून प्रचाराचा धडाका 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पुढील 6 दिवसात 21 सभा घेणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातही (Maharashtra Assembly 2024) सभा होणार आहेत. 8 आणि 9 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एकूण चार ठिकाणी सभा घेणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या 8 नोव्हेंबरला धुळे आणि नाशिकात दोन सभा होणार आहेत. मंगळवार ११ नोव्हेंबर रोजी नागपूरमधील रॅलीनंतर कोल्हापुरात महायुतीच्या सभेला हजेरी लावणार आहेत. अकोला आणि नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र (PM Narendra Modi) मोदी 9 नोव्हेंबरला जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. महायुतीचे (Mahayuti’s campaign meeting) सरकार आणण्यासाठी फडणवीसांकडून मोठ्या संख्येने सभांचे नियोजन करण्यात आले आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.