Virat Kohli : विराट कोहलीचा ३६ वा वाढदिवस आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं आव्हान

Virat Kohli : गेल्यावर्षी ३५ वा वाढदिवस त्याने शतकाने साजरा केला होता.

65
Virat Kohli : विराट कोहलीचा ३६ वा वाढदिवस आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं आव्हान
Virat Kohli : विराट कोहलीचा ३६ वा वाढदिवस आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं आव्हान
  • ऋजुता लुकतुके

विराट कोहलीला (Virat Kohli) आपला वाढदिवस मैदानात साजरा करायला आवडतो. गेल्यावर्षीही ३५ वा वाढदिवस साजरा करताना त्याने एकदिवसीय विश्वचषकात शतक झळकावलं होतं. आणि वाढदिवस असाच हवा, असं नंतर बोलूनही दाखवलं होतं. आताची परिस्थिती वेगळी आहे. तो मैदानात असू शकला असता. पण, मुंबई कसोटी भारतीय फलंदाजांनीच तीन दिवसांत संपवली. त्यात संघाचा पराभव झाला. आणि आता भारतीय मैदानांवरच ०-३ असा पराभवाचं शल्य बोचत असताना विराट आपला वाढदिवस साजरा करतोय. शिवाय समोर आव्हान उभं आहे ते ऑस्ट्रेलियाच्या खडतर दौऱ्याचं.

अर्थात, आतापर्यंत विराटने भारताला अनेक संस्मरणीय विजय एकहाती मिळवून दिले आहेत. त्यामुळे त्याच्या कारकीर्दीतील हा तात्पुरता कसोटीचा काळ कधी ना कधी जाईल अशीच सगळ्यांना अपेक्षा आहे. २२ नोव्हेंबर पासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिली कसोटी सुरू होईल.

(हेही वाचा – IPL Retentions 2024 : कोलकाता संघाने खेळाडूंसाठी ५७ कोटी रुपये मोजल्यानंतरही त्यांच्याकडे ६९ कोटी रुपयेच कसे उरले?)

विराटच्या वाढदिवशी जाणून घेऊया त्याच्या नावावर जागतिक क्रिकेटमध्ये असलेले काही अनोखे विक्रम,

१. सर्वाधिक एकदिवसीय शतकं – गेल्यावर्षी एकदिवसीय विश्वचषकादरम्यान विराट कोहलीने सचिन तेंडुलकरला सर्वाधिक एकदिवसीय शतकांच्या बाबतीत मागे टाकलं. न्यूझीलंड विरुद्धच्या उपान्त्य लढतीत त्याने ११७ धावा केल्या होत्या. आणि त्याचबरोबर ५० वं एकदिवसीय शतक त्याच्या नावावर लागलं.

२. वेगवान १३,००० धावा – सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रम विराट कोहलीने विश्वचषका दरम्यानच मोडला. १३,००० धावांचा टप्पा त्याने २६७ डावांतच पार केला. सचिनने त्यासाठी ३१४ डाव घेतले होते. म्हणजेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान १३,००० धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर जमा झाला.

३. एका मालिकेत व विश्वचषकात सर्वाधिक धावा – २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात विराट कोहलीने ७६५ धावा केल्या. एकाच स्पर्धेत केलेल्या या सर्वाधिक वैयक्तिक धावा आहेत. आणि हा आणखी एक विक्रम विराटच्या नावावर जमा झाला आहे. एका मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही विराटच्या नावावर आहे.

(हेही वाचा – Sada Saravankar हेच महायुतीचे उमेदवार; आशिष शेलारांनी स्पष्ट केली माहिमविषयीची भूमिका)

४. एका संघाविरुद्ध सर्वाधिक शतकं – विराटने श्रीलंकेविरुद्ध सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून १० शतकं ठोकली आहेत. आणि एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक शतकं ठोकण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.

५. सर्वाधिक मालिकावीर पुरस्कार – विराट कोहलीने आता टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. पण, सर्वाधिक वेळा मालिकावीर पुरस्कार मिळवण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. त्याने ७ टी-२० मालिकांमध्ये मालिकावीर हा किताब जिंकला आहे.

६. सर्वाधिक मालिकावीर पुरस्कार (सर्व प्रकारचं क्रिकेट) – टी-२०, एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट मिळून सर्वाधिक मालिकावीर पुरस्कार मिळवण्याचा विक्रमही विराट कोहलीच्याच नावावर आहे. त्याने एकूण २१ मालिकांमध्ये ही किमया केली आहे.

(हेही वाचा – फोडाफोडीच्या राजकारणाचे आद्य शरद पवार; आता पक्ष आणि चिन्हही ताब्यात घेतात; Raj Thackeray यांचा घणाघात)

७. सर्वाधिक टी-३० अर्धशतकं – विराट कोहलीने टी-२० प्रकारात ३९ अर्धशतकं ठोकली आहेत. एखाद्या फलंदाजाने या प्रकारात केलेली ही सर्वाधिक अर्धशतकं आहेत. या विक्रमात त्याला एक भागिदारही आहे. तो म्हणजे पाकिस्तानचा बाबर आझम. इतकी वर्षं सर्वाधिक टी-२० धावांचा विक्रमही विराट कोहलीच्या नावावर होता. पण, अलीकडेच बाबर आझमने तो मोडला होता. तर पाकिस्तानचाच महम्मद रिझवान या दोघांच्या मागे आहे. त्याच्या नावावर २९ टी-२० अर्धशतकं आहेत.

८. सर्व आयसीसी करंडक जिंकले – विराटने भारताकडून खेळताना आयसीसी टी-२० विश्वचषक (२००८), आयसीसी एकदिवसीय विश्वचषक (२०११) आणि आयसीसी चॅम्पियन्स करंडक (२०१३) अशा तीनही आयसीसी स्पर्धा जिंकल्या आहेत. तो कप्तान असताना भारतीय संघाने आयसीसीची तेव्हा प्रचलित असलेली कसोटी क्रिकेटसाठीची गदाही जिंकली होती. त्यानंतर अलीकडे आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धाही सुरू झाली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.