Pandharpur Vitthal Temple : वारकऱ्यांसाठी खुशखबर! कार्तिकी सोहळ्यासाठी पंढरीत २४ तास विठ्ठल दर्शन 

75
Pandharpur Vitthal Temple : वारकऱ्यांसाठी खुशखबर! कार्तिकी सोहळ्यासाठी पंढरीत २४ तास विठ्ठल दर्शन 
Pandharpur Vitthal Temple : वारकऱ्यांसाठी खुशखबर! कार्तिकी सोहळ्यासाठी पंढरीत २४ तास विठ्ठल दर्शन 

संताची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात आषाढी (Ashadhi) आणि कार्तिकी वारीत (Kartiki Vari) मोठ्या संख्येने वारकरी मंडळी विठूरायांचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूर (Pandharpur) नगरीत दाखल होत असतात. दरम्यान, आषाढीच्या वारीनंतर भाविकांना उत्सुकता असते ती कार्तिकी एकादशीची. कार्तिकी सोहळ्याला येणाऱ्या हजारो भाविकांना अखंड देवाच्या दर्शनाचा लाभ व्हावा यासाठी बुधवार ०६ नोव्हेंबर रोजी देवाचा पलंग निघणार असून, देवाचे २४ तास दर्शन सुरू राहणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके (Rajendra Shelke) यांनी दिली. (Pandharpur Vitthal Temple)

(हेही वाचा – Virat Kohli : विराट कोहलीचा ३६ वा वाढदिवस आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं आव्हान)

वारकरी संप्रदायाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. या परंपरे नुसार आषाढी आणि कार्तिकी वारीच्या दरम्यान भाविकांना दर्शन सुलभ व्हावे म्हणून देव २४ तास उभा असतो. या कालवधीत देवाच्या शेजघरातील विश्रांतीचा पलंग काढला जातो. हा पलंग काढण्या आधी विधिवत पूजा केली जाते. त्या नंतर देवाच्या शेजघरातील पलंग बाहेर काढण्यात आला. यावेळी या चांदीच्या पलंगावरील देवाच्या गाद्या गिरद्या देखील बाहेर काढून ठेवण्यात आल्या. देवाचे शेजघर मोकळे करून ठेवण्यात आले. देवाचे सर्व राजोपचार बंद करून देव फक्त भाविकांच्या दर्शनासाठी सज्ज झाला आहे. देवाचे दर्शन २४ तास खुले केल्याने आता रोज चरण स्पर्श करत ५० हजार तर मुखदर्शनातून ५० ते ६० हजार भाविकांना दर्शन मिळणार आहे. 

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.