Patan मध्ये मविआतील बंडखोरी शंभुराज देसाईंच्या पथ्यावर?

देसाई आणि पाटणकर यांचे गट मुंबईतल्या माथाडी मतदारांशी संवाद साधत असताना पाटणमधील उबाठानेही अडीच वर्षांपासून मुंबईत राबता ठेवला आहे. यामुळे पाटणच्या लढ्यात तिरंगी लढत होणार असली तरी बंडखोरीमुळे महायुतीला फायदा होण्याची शक्यता आहे.

108
पाटण (Patan) विधानसभा निवडणुकीत आता चित्र स्पष्ट झाले आहे. इथे मविआमध्ये बंडखोरी झाल्यामुळे महायुतीचे उमेदवार शंभूराज देसाई यांच्यासाठी जमेची बाजू बनली आहे. या ठिकाणी महायुतीचे शंभूराज देसाई हे अधिकृत उमेदवार आहेत, तर उबाठाचे हर्षद कदम हे मविआचे अधिकृत उमेदवार आहेत. मात्र या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सत्यजित पाटणकर यांनी बंडखोरी केल्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या बंडात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मोठी भूमिका बजावली. मात्र, हा निर्णय न पटलेले पाटणमधील अनेक शिवसैनिक उबाठामध्येच राहिले. त्यांचे नेतृत्व हर्षद कदम करत आहेत. पाटणचा (Patan)  विद्यमान आमदार पक्ष सोडून गेला तरी कदम यांनी उबाठातून उमेदवारी मागितली. त्यांनीही गेल्या अडीच वर्षांपासून पाटण येथील मूळचे पनवेल, ऐरोलीपासून ते मुलुंड, कुर्ला, दादरपर्यंत स्थायिक असलेल्या मुंबईल्या भागवाल्यांशी संपर्क ठेवला आहे.

पाटणची भिस्त मुंबईतील माथाडींवर 

पाटण (Patan) मतदारसंघात गेल्या ५ वर्षांत जवळपास २ हजार ९२० कोटी रुपयांची विकासकामे पूर्ण झाली आहेत. पाटण मतदारसंघातील रणसंग्राम आतापर्यंत शंभूराज देसाई आणि सत्यजित पाटणकर यांच्यात होत आला आहे. या मतदारसंघात आतापर्यंत पक्ष कोणताही असो, देसाई आणि पाटणकर या दोघांत पारंपरिक लढत होत आली आहे. दोन्ही गटांनी चुरशीने झुंज दिली आहे. याठिकाणी प्रत्येक गावातील एकेक मतदानासाठी दोन्ही गट प्रयत्नशील असतात. पाटणचा (Patan) मतदार माथाडी कामगार तसेच इतर अनेक नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबईत स्थायिक असून, सुमारे ४० हजारांहून अधिक मतदार येथे आहेत. मतदारांना आपल्याकडे वळवून घेण्यासाठी दोन्ही गटांनी कसोसीने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचप्रमाणे मुंबईतील उबाठानेही पाटणवर लक्ष केंद्रित केले आहे. देसाई आणि पाटणकर यांचे गट मुंबईतल्या या मतदारांशी संवाद साधत असताना पाटणमधील उबाठानेही अडीच वर्षांपासून मुंबईत राबता ठेवला आहे. यामुळे पाटणच्या लढ्यात तिरंगी लढत होणार असली तरी बंडखोरीमुळे महायुतीला फायदा होण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.