Assembly Election 2024 : दापोली तालुक्यात ‘रायगड पॅटर्न’; एकाच वेळी ६ कदम निवडणुकीच्या रिंगणात

121
Assembly Election 2024 : दापोली तालुक्यात ‘रायगड पॅटर्न’; एकाच वेळी ६ कदम निवडणुकीच्या रिंगणात
Assembly Election 2024 : दापोली तालुक्यात ‘रायगड पॅटर्न’; एकाच वेळी ६ कदम निवडणुकीच्या रिंगणात

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात महायुतीकडून रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम (Yogesh Kadam) यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीच्या शिवसेना उबाठा पक्षामधून संजय कदम (Sanjay Kadam) विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत विजय व्हावा यासाठी हे दोन्ही नेते पूर्ण ताकदीने प्रयत्न करीत आहेत. मात्र ‘या’ जागा सध्या एका आगवळ्यावेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. (Assembly Election 2024)     

दापोली मतदारसंघात तब्बल तीन संजय कदम (Sanjay Kadam) आणि तीन योगेश कदम (Yogesh Kadam) रिंगणात उतरले आहेत. त्याशिवाय चिपळूण मतदारसंघात दोन शेखर निकम आणि दोन प्रशांत यादव निवडणूक लढवत आहेत. महत्त्वाचे म्हणजे नामसाधर्म्य असणारे सर्व अर्ज शेवटच्या दिवशीच म्हणजेच २९ ऑक्टोबर रोजी दाखल करण्यात आले आहेत. 

पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात त्याच्या नावासारखे नाव असलेला दुसरा उमेदवार उभा करण्याची पद्धत गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये रायगड मतदारसंघात (Raigad Constituency) वापरण्यात आली होती. या लोकसभा मतदारसंघात समावेश असलेल्या दापोली विधानसभा मतदारसंघातही यावेळी हाच प्रकार करण्यात आला आहे.

(हेही वाचा – Satara मध्ये शिवेंद्रराजे आणि अमित कदम यांच्यात लढत; उदयनराजेंच्या पाठिंब्यामुळे शिवेंद्रराजेंचे पारडे जड)

दापोलीमध्ये (Dapoli Assembly) उबाठा पक्षाकडून संजय कदम आणि शिवसेनेकडून विद्यमान आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) रिंगणात आहेत. येथे संजय कदम नावाच्या दोन आणि योगेश कदम नावाच्या दोन अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.