शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राधानगरी येथे प्रचारसभेत बोलतांना आश्वासनांची खैरात वाटली. यामध्ये राज्यातील सर्व मुलांनाही मुलींप्रमाणे मोफत शिक्षण देण्याची अवास्तव घोषणा केली. या
काय म्हणाले उद्धब ठाकरे?
माझ्याकडून मागच्यावेळी चूक झाली होती. सगळ काही देऊनसुद्धा यांनी गद्दारी केली, सगळ देऊनही शिवसेना या नावाच्या आईवरती वार करणारा माणूस तुमचा होऊ शकतो का? या मतदारसंघाच्या विजयाची जबाबदारी आता सतेज पाटील यांच्यावरच टाकत आहे. आपल्याला अजूनही न्यायालयाकडून न्याय मिळालेला नाही. डोळ्यावरची फक्त पट्टी काढली आहे. मी महाराष्ट्रासाठी लढत आहे. माझ्या रक्तात गद्दारी नाही, मी माझ्या महाराष्ट्राला गुलाम करणार नाही, असेही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray म्हणाले.
सुरतमध्ये बांधणार छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर
आघाडीचे सरकार आल्यानंतर आम्ही महाराजांचे पुतळे नाही उभारणार तर, प्रत्येक जिल्ह्यात महाराजांचंचे भव्य मंदिर उभारणार. मला जमले ना तर सुरतमध्येही शिवरायांचे मंदिर बांधून दाखवेन. इंग्रजांना विरोध करण्याकरता महाराजांनी जी सुरत लुटली त्याच सुरतेला तुम्ही गद्दारांना घेऊन गेलात. त्याच सुरतेमध्ये मी शिवाजी महाराजांचं मंदिर बांधून दाखवेन”, असेही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray म्हणाले.
जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार
जसे आपले मनोहर जोशी मुख्यमंत्री होते तेव्हा पाच वर्षांत पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवले होते, महागाई वाढू दिली नव्हती. आज मी जाहीर करतोय, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पुढची पाच वर्षे डाळ, तेल, साखर, तांदूळ सारखे जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवून दाखवणार. सरकारही स्थिर आणि भावही स्थिर”,, असेही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray म्हणाले.
राज्यात स्वतंत्र महिला पोलीस ठाणे उभारणार
राज्यातील महिला पोलिासांची पदे रिक्त आहेत. मग आमच्या बहिणींवर होणाऱ्या अन्यायाची तक्रार कोण घेणार? पोलीस ठाण्यात गेल्यावर कोणी तक्रार घ्यायची? महिला पोलिसांची पदे रिक्त असतील तर महिला सुरक्षा करणार कोण? महिलांसाठी शिपाईपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्व पदे भरणार. तसंच, स्वतंत्र महिला पोलीस ठाणे उभारणार, असेही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)
Join Our WhatsApp Community