पिंपरी, भोसरी आणि चिंचवड मतदारसंघातील गृहनिर्माण सोसायट्या मधील मतदान केंद्रांवर १०० टक्के मतदान घडवून आणण्याचा निर्धार महानगरपालिका, सोसायटी फेडरेशन आणि गृहनिर्माण संस्थाच्या समन्वय बैठकीत करण्यात आला असून मतदार जनजागृती अभियानाअंतर्गत शहरतील सर्व गृहनिर्माण संस्थांना मतदार जनजागृतीसाठी आवश्यक असलेले साहित्य देखील महापालिकेच्या वतीने पुरविण्यात येत, असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिली. (Maharashtra Assembly Election)
सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी, भोसरी आणि चिंचवड मतदार संघात मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी महापालिकेच्यावतीने आयुक्त शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त तथा स्वीप नोडल विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त अण्णा बोदडे यांच्या नियंत्रणाखाली मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.त्यानुषंगाने आज महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात अतिरिक्त आयुक्त तथा स्वीप नोडल विजयकुमार खोराटे यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील सोसायटी फेडरेशन आणि गृहनिर्माण संस्था यांच्या प्रतिनिधींसोबत समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीत गृहनिर्माण संस्थांमधील मतदान केंद्रांवर १०० टक्के मतदान घडवून आणण्याचा निर्धार करण्यात आला. (Maharashtra Assembly Election)
(हेही वाचा – Canada Hindu Temple : कॅनडातील मंदिरावरील हल्ल्याच्या प्रकरणी पोलीस अधिकारी निलंबित; कॅनडा सरकारची कारवाई)
यावेळी उपआयुक्त अण्णा बोदडे, उप आयुक्त तथा २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी पंकज पाटील, महापालिकेच्या निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांच्यासह पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटस महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, उपाध्यक्ष सुभाष कर्णिक, महासंघाचे प्रतिनिधी, चिखली-मोशी हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे, उपाध्यक्ष निलेश खांडगे, फेडरेशनचे पदाधिकारी तसेच शहरातील गृहनिर्माण संस्था व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (Maharashtra Assembly Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community