Assembly Election 2024 : अमरावती जिल्ह्यात आठ मतदारसंघात १६० उमेदवार रिंगणात

महाविकास, महायुतीतील बंडखोरी कायमच सर्वाधिक बडनेरात, तर मेळघाटात सर्वात कमी उमेदवार

194
Assembly Election 2024 : अमरावती जिल्ह्यात आठ मतदारसंघात १६० उमेदवार रिंगणात
  • प्रतिनिधी

अमरावती जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील चित्र सोमवारी दुपारी स्पष्ट झाले. आठ मतदारसंघासाठी तब्बल १६० उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये सर्वाधिक २६ उमेदवार बडनेरा मतदारसंघात असून, त्या खालोखाल धामणगाव रेल्वे २४, अमरावती व अचलपूर २२, मोर्शी १९, तिवसा व दर्यापूर १६, मेळघाट विधानसभेसाठी १५ उमेदवार रिंगणात नशीब आजमावित आहेत. आठ मतदारसंघातून ८८ उमेदवारांनी मैदान सोडले.

बंडखोरीमुळे चर्चेत आलेल्या अमरावती व बडनेरा तसेच दर्यापूर मतदारसंघात पुरेपूर प्रयत्नानंतरही महायुतीच्या उमेदवारांनी मैदान सोडले नाही. अमरावतीतून जगदीश गुप्ता, बडनेरातून तुषार भारतीय, तर दर्यापुरातून माजी आमदार रमेश बंदिले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांकडून त्यांच्यावर कारवाई शिवाय पर्याय नाही. सोबतच बडनेरा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरोधात प्रीती बंड, तर वरूड मतदारसंघात विक्रम ठाकरे यांनीही नामांकन कायमच ठेवले. त्यामुळे त्यांची भूमिका या मतदारसंघामध्ये मोठा उलटफेर करणारी ठरणार आहे. तिवसा मतदारसंघातून रविराज देशमुख, तर मेळघाटमधून माजी आ. प्रभुदास भिलावेकर यांनी मात्र तलवार म्यान केली. देशमुख यांना भाजपाने थेट प्रदेश उपाध्यक्षपदी नेमले. भिलावेकर यांनी केवलराम काळे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय नेत्यांशी चर्चेअंती घेतला.

(हेही वाचा – Assembly Election 2024 : दापोली तालुक्यात ‘रायगड पॅटर्न’; एकाच वेळी ६ कदम निवडणुकीच्या रिंगणात)

तिवस्यात १६ उमेदवार रिंगणात

काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांच्या उमेदवारीमुळे संपूर्ण राज्यभर ओळख निर्माण केलेल्या तिवसा मतदारसंघात १६ उमेदवारानध्ये लढत होणार आहे अखेरच्या दिवशी २० उमेदवारांनी मैदान सोडले. भाजपचे नेते रविराज देशमुख यांच्याकडे सर्वाच्या नजरा लागल्या होत्याः मात्र त्यांनी पक्षादेश पाळत नामांकन मागे घेतल्याने राजेश वानखडे यांच्यापुढील अडथळे कमी झाले आहेत. दिवाकर माहोरे, राजू जामनेकर, शुभम गजभिये, संजय देशमुख, अजून युवनाते, अहिन श इंगोले, बादाराव महल्ले, दिनकर सुंदरकर, नमिता तिवारी, प्रवीण देशमुख, युसूफ शहा, अॅड रमेश तंतरपाळे, रवी देशमुखा, राजेश रामदास वानखडे, रामभाऊ गडेकर, वासुदेव पळसकर, विनोद भालेराव, सजील खान, सुयश श्रीखंडे, सैय्यद अलीम यांनी नामांकन मागे घेतले आहे.

दर्यापुरात १६ उमेदवारांमध्ये लढत

काँग्रेसच्या हक्काचा मतदारसंघ वाटाघाटीत मित्र पक्षासाठी सोडावा लागल्याने काँग्रेसमधूनच स्थानिक नेत्यांवर गंभीर आरोप झाल्याने राज्यभर चर्चेत आलेल्या दर्यापूरात आता १६ उमेदवार रिंगणात आहेत. अखेरच्या दिवशी १६ उमेदवारांनी मैदान सोडले. येथे भाजपाचे माजी आ. रमेश बंदिले यानी रवी राणा याच्या युवा स्वाभिमानच्या पानावर नशीब आजमाविण्याचे ठरविले आहेः मात्र त्यामुळे त्याच्यावर पक्षातर्गत कारवाईची शक्यता आहे. काँग्रेसच्या उमेदवारीवर दावेदारी ठोकणारे गुणवंत देवपारे यांनीसुध्दा माघार घेतली. रामेश्वर अभ्यंकर, सजय आठवते, गोपाल चंदन, विजय विल्हेकर, विक्रम पारडे, श्रीराम नेहर, संजय पिंजरकर, नंदिनी दयाराम थोटे, रमेश अभोरे, गुगवंत देवपारे, सिध्दार्थ वानखडे, दिलीप गवई, शरद आठवले, संतोष कोल्हे, भीमराव कुऱ्हाडे या उमेदवारांनी नामांकन अर्ज मागे घेतला आहे.

(हेही वाचा – Patan मध्ये मविआतील बंडखोरी शंभुराज देसाईंच्या पथ्यावर?)

मोर्शीत १९ उमेदवारांमध्ये होणार लढत

मैत्रिपूर्ण लढतीच्या मोर्शी पॅटर्नमुळे चर्चेत आलेल्या मोर्शी मतदारसंघात अखेरच्या दिवशी १९ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपाने येथे उमेश यावलकर, तर अजितदादांच्या राष्ट्रवादीने देवेंद्र भुयार यांना एबी फॉर्म दिला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने गिरीश कराळे यांना रिंगणात उत्तरविले. काँग्रेसत्ता युवा चेहरा विक्रम ठाकरे सुध्दा रिंगणात आहेत. अखेरच्या दिवशी १० उमेदवारांनी माघार घेतली. त्यामध्ये अमित कुबडे, अॅड. आशीष वानखडे, नईम खान, डॉ. मनोहर आंडे, महेंद्र भातकुले, राजेंद्र आडे, विठ्ठल कोल्हे, श्रीधर सोलव, सौरभ मानकर, संजय खासबागे यांचा समावेश आहे.

अमरावतीत २२ उमेदवारांमध्ये लढत

पूर्णपणे शहरी चेहरा असलेला अमरावती विधानसभा मतदारसंघात २२ उमेदवार रिंगणात आहेत. अखेरच्या दिवशी ७ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामध्ये रावसाहेब गोडाणे, अनंता इंगळे, बबन रडके, संजय भोवते, राजेश गवई, प्रेमा लव्हाळे, सुलताना परविन मो. जाकीर यांचा समावेश आहे. या मतदारसंघात भाजपाचे हेवीवेट नेते जगदीश गुप्ता यांनी मात्र उमेदवारी कायमच ठेवली. त्यामुळे महायुती उमेदवारापुढील अडचणी वाढल्या आहेत. मतदारसंघात आता काँग्रेसचे उमेदवार सुनील देशमुख, महायुतीच्या सुलभा संजय खोडके, मनसेचे पप्पू पाटील व अपक्ष जगदीश गुप्ता यांच्यात खऱ्या अर्थाने सामना रंगणार आहे.

(हेही वाचा – Canada Hindu Temple : कॅनडातील मंदिरावरील हल्ल्याच्या प्रकरणी पोलीस अधिकारी निलंबित; कॅनडा सरकारची कारवाई)

तिहेरी लढत होणार

अमरावती मतदारसंघात महायुतीच्या सुलभा खोडके आणि महाविकास आघाडीचे डॉ. सुनील देशमुख, मनसेचे मंगेश पाटील, तर भाजपाचे बंडखोर जगदीश गुप्ता यांच्यासह २२ उमेदवार रिंगणात आहेत. असे असले, तरी अमरावतीत तिहेरी लहत होण्याचे संकेत आहे. शेवटच्या टप्प्यात दुहेरी लडत होईल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. चिन्ह वाटप होण्यापूर्वीच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आहे

अचलपुरात २२ उमेदवार रिंगणात

बच्चू कडू विरुद्ध बबलू देशमुख असा सामना यावर्षीही अचलपुरात रंगणार आहे. अखेरच्या दिवशी ८ उमेदवारांनी नामाकन परत घेतले. त्यामुळे आता २२ उमेदवार रिंगणात आहेत. तमीज शहा रहेमान शहा, मो. शफी शेख कादर, नंदकिशोर वासनकर, अक्षरा रुपेश लहाने, गिरीधर महाराज रौराळे, आनंद गायकवाड, कैलास मोरे, नितीन डाहे या उमेदवारांनी माधार घेतल्याने प्रमु‌ख २२ उमेदवार लढतीत आहे. या मतदारसंघात भाजपाने प्रवीण तायडे यांना उमेदवारी दिली त्यामुळे भाजपामध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता. १० पेक्षा जास्त इच्छुकांनी भाजपातर्फे नामांकन दाखल केले. शेवटच्या दिवशी प्रमोदसिंह गईल यानी नामाकन कायमच ठेवले. त्यामुळे भाजपातील बंडाळीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

(हेही वाचा – Virat Kohli : विराट कोहलीचा ३६ वा वाढदिवस आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं आव्हान)

तिरंगी लढतीत कुणाची सरशी

अचलपूर मतदारसंघात यंदा भाजपाने प्रवीण तायडे यांना उमेदवारी देऊन वेगळा राजकीय डाव खेळला आहे. तर महाविकास आघाडीतीच काँग्रेसचे बबलू देशमुख, प्रहारचे बच्चू कडू, भाजपाचे बंडखोर ठाकूर प्रमोद सिंह गड्रेल या प्रमुख उमेदवारांसह २२ जण मैदानात आहेत. मात्र, बच्चू कडू यांचा पंचवार्षिक आमदारकीचा अश्वमेध रोखण्यासाठी राजकीय पक्षाची रणनीती यशस्वी होते का ? हे २३ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे.

बडनेऱ्यात २६ उमेदवारांमध्ये लढत

भाजपाने स्वतः चा उमेदवार डावलून अपक्ष आ. रवी राणा यांना उमेदवारी दिल्याने अखेर भाजपामध्ये बंडाळी झाली. तुषार भारतीय या युवा नेत्याने थेट पक्षालाच आव्हान दिले आहे. अखेरच्या दिवशी १४ उमेदवारानी माघार घेतल्याने बडनेरामध्ये आता २६ उमेदवार रिंगणात आहे. येथे महाविकास आघाडीतही बंडाचे झेंडे फडकले. प्रीती संजय बंड यांनी शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने नामांकन कायम ठेवले आहे. परवेश नितीन कदम, मनिष पाटील, सिद्धार्थ गोंडाणे, प्रकाश कठाणे, अॅड राजू जामनेकर, मंजुषा प्रशांत जाधव, अनिल गडलिंग, सुनंदा जयराम अभ्यकर, भारत पाटील, गजानन चुनकीकर, सूरज घरडे, प्रफुल्ल नेतनराव, प्रदीप महाजन, संजय महाजन या उमेदवारांनी नामांकन अर्ज मागे घेतला.

(हेही वाचा – Sada Saravankar हेच महायुतीचे उमेदवार; आशिष शेलारांनी स्पष्ट केली माहिमविषयीची भूमिका)

चौरंगी लढत, कुणाची बाजी ?

बडनेरा मतदारसंघात महायुतीतून युवा स्वाभिमान पार्टीकडून रवी राणा, महाविकास आघाडीतून उद्धवसेनेचे सुनील खराटे, तर अपक्ष म्हणून प्रीती बंड, तुषार भारतीय या प्रमुख उमेदवारांसह २६ जणांचे अर्ज दाखल असून, ते आमदारकीसाठी नशीब आजमावत आहे. एकंदरीत बडनेराचे राजकीय वातावरण बघता पहिल्या टप्प्यात चौरंगी लहत होईल, असे दिसून येते, यावेळी आ. रवी राणा यांचा चौथ्यांदा विजय लक्षवेधी असेल.

धामणगावात २४ उमेदवार रिंगणात

गतवेळेस वंचितच्या नीलेश विश्वकर्मा यांच्या पुण्याईने आमदार झालेल्या प्रताप अडसड त्याचा सामना याहीवर्षी महाविकास आघाडीचे प्रा. वीरेंद्र जगताप यांच्याशीच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अखेरच्या दिवशी केवळ ४ उमेदवारांनी माधार घेतली, तर २४ उमेदवार रिंगणात आहेत. अनत खडसे, सुभाष भोयर, मनीष वीरेंद्र जगताप, शैलेश रोहणकर या चार उमेदवारांनी नामांकन अर्ज मागे घेतला. त्यामु‌ळे आता तब्बल २४ उमेदवारांमध्ये लइत होणार आहे. वंचितच्या उमेदवारीवर नीलेश विश्वकर्मा यंदाही नशीब आजमावित आहेः मात्र गतवेळेस झालेल्या चुका प्रा. जगताप भरून काढतील किवा कसे, याकडे मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागले आहे. या एकच मतदारसंघात भाजपात कुठलीही बंडाळी झाली नाही.

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election : राज्यात ९.७ कोटी मतदार; कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक मतदार संख्या?)

मेळघाटात १५ उमेदवार रिंगणात

मेळघाट विधानसभा मतदारसंघात २४ उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. पैकी ९ जणांनी माघार घेतली. त्यामुळे आता १५ उमेदवार रिंगणात आहेत. माघार घेणाऱ्या उमेदवारांमध्ये प्रभुदास भिलावेकर या भाजपाच्या माजी आमदारांचा समावेश आहे. त्यामुळे महायुतीतील कलह काही प्रमाणात कमी झाला. सविता दशरथ आहाके, विपीन पटेल, रुख्मा छोटेलाल भिलावेकर, नितेश चुबीलाल भिलावेकर, माधुरी हिरालाल जावरकर, मना दारशिंबे, श्यामकुमार पटोरकर, किशोर बालू पटेल या उमेदवारांनी नामांकन अर्ज मागे घेतल्याने आता मेळघाट मतदारसंघात १५ उमेदवारांमध्ये लढल होणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे चित्र पुरेसे स्पष्ट झाले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत होणार, यात नवीन काही नव्हते. उत्सुकता होती, ती मर्यादित प्रभाव असलेले छोटे पक्ष कोणाचा लाभ करून देतात याची आणि बंडखोरांची. मर्यादित प्रभाव असलेल्या पक्षांनी आपला मतदार सुरक्षित राखण्याची आणि घासाघीस करण्याची आपली क्षमता दाखवून देण्याची संधी सोडली नाही. महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष, वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी पक्ष, बहुजन विकास आघाडी, प्रहार यांच्याबरोबरच परिवर्तन आघाडीदेखील निवडणूक रिंगणात आहे. गेल्या दोन दशकांत उदयाला आलेल्या या पक्षांनी स्थानिक पातळीवर गणिते जमवली आहेत. त्यामध्येही कोणाचे विजयाचे गणित बिघडवायचे याची ताकद आपल्या हाती राहावी, यासाठी या पक्षांनी व्यूहरचना केली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.